शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शहरात दुचाकी गाड्यांचा ‘स्टॉक आऊट’

By admin | Updated: April 1, 2017 00:36 IST

भारत स्टेज फोर (बीएस-४) या निकषांचे पालन न करणाऱ्या वाहनांची विक्री १ एप्रिलपासून बंद होणार असल्याचा परिणाम भंडारा जिल्ह्यातही जाणवला.

बीएस-३ निकषाचा फटका : तीन दिवसांत ६५९ वाहनांची नोंद, ग्राहकांची गर्दीभंडारा : भारत स्टेज फोर (बीएस-४) या निकषांचे पालन न करणाऱ्या वाहनांची विक्री १ एप्रिलपासून बंद होणार असल्याचा परिणाम भंडारा जिल्ह्यातही जाणवला. बीएस-४ च्या निर्णयामुळे मागील तीन दिवसांत उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे ६५९ दुचाकी वाहनांची विक्री झाल्याची नोंद झाली आहे. दुसरीकडे डिस्काऊंट आॅफर असल्यामुळे वाहन खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केल्याने दुचाकी गाड्यांचा आज शेवटच्या दिवशी स्टॉक आऊट होता.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे बीएस-४ उत्सर्जन निकषांची पालन न करणाऱ्या कोणत्याही वाहनांच्या म्हणजे प्रदुषण करणाऱ्या बीएस-३ वाहनाच्या नोंदणीला १ एप्रिल २०१७ पासून बंदी घालण्यात आली आहे. परिणामी बीएस-३ वाहनांची ३१ मार्चपुर्वी विक्री करुन आरटीओमार्फत नोंदणी होणे अतिआवश्यक होते. वाहनांची खरेदी व्हावी या उद्देशापोटीही दूचाकी वाहन निर्मात्या कंपन्यांनीही दूचाकी खरेदीवर डिस्काऊंट आॅफर देवू केली होती. विविध कंपन्यांच्या दूचाकीसह चारचाकी वाहन खरेदीवरही डिस्काऊंट आॅफर होती. पंरतु जिल्ह्याच्या आर्थिक स्तर बघता, चारचाकी वाहनापेक्षा दूचाकी वाहन खरेदीवर ग्राहकांचा कल दिसून आला. परिणामी गुढीपाडव्याच्या सणापासून दूचाकी वाहनांच्या खरेदीमध्ये वाढ होत असल्याचे दिसून आले. दूसरीकडे सर्वोच्च न्यायालयाचे दिशानिर्देश आल्याने ग्राहकांकडेही फक्त दोन दिवसांचा कालावधी शिल्लक होता. परिणामी डिस्काऊंट आॅफरचा लाभ मिळविण्यासाठी ग्राहकांनी शोरुममध्ये गर्दी केली होती.भंडारा शहरात सर्वच कंपन्यांचे दूचाकी वाहनांचे शोरुम आहे. गुरुवार तथा शुक्रवारी ग्राहकांची गर्दी दिसून आली. उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे २९ मार्चला ३०९, ३० मार्चला ७६ तर शुक्रवारला २७४ दूचाकी वाहने खरेदी करण्यात आल्याची नोंद करण्यात आली.दिवसभरात अनेक तरुण मंडळी आॅफरचा लाभ मिळविण्यासाठी शोरुमच्या येरझाऱ्या करीत होते. मात्र काही ठिकाणी दूचाकी वाहनांच्या स्टॉक समाप्त झाल्याने या तरुणांची निराशा झाली. तर कुठे शोरुम खुले असले तरी वाहन नसल्याचे सांगण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत आरटीओ कार्यालयात वाहन नोंदणीची कामे सुरु होती. दूचाकी वाहन खरेदीच्या माध्यमातून लक्षावधी रुपयांची उलाढालही झाली. (प्रतिनिधी)