करडी (पालोरा) : जबरी चोरी, दरोडा घालण्याचे उद्देशाने करडी परिसरात फिरत असलेल्या दोन इसमांना करडी पोलिसांनी शिताफिने अटक केली. त्यांचेकडून चोरीचे साहित्य, दागीने व धारदार शस्त्र ताब्यात घेतले. अटक झालेल्यांमध्ये किसन उर्फ क्रिष्णा शिवा बागडे (२७) रा. चांदोरी, मनिष अशोक पटले (२५) लालीपूरा जि. मंडला (म.प्र.) यांचा समावेश आहे. १८ आॅक्टोंबरला दुपारी १२.३० वाजता दरम्यान करडी पोलीस चौकीचे सहायक फौजदार अश्विनकुमार मेहर, हवालदार नंदेश्वर, शिपाई गौतम परिसरात कर्तव्यावर असताना दोन संशयीत इसम प्राणघातक शस्त्रांसह पल्सर मोटारसायकलने फिरत असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे करडी, बोरी, पांजरा, पालोरा मार्गावर पोलिसांनी शोध मोहिम राबविली. यादरम्यान करडी ते पालोरा राज्य मार्गावर विद्युत विभागाचे पॉवर हाऊसजवळ दोन इसम लाल रंगाचे एमएच-३५/व्ही-५९४१ पल्सर दुचाकीने करडीकडून पालोराकडे जाताना आढळून आले. डबल सिट असलेल्या इसमांना थांबवून त्यांची विचारपूस केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. पोलिसांचा संशय बळावल. त्यांच्या अंगझळतीत धारदार तलवार मिळून आली. मनिष पटेल याच्या जवळून पांढऱ्या धातुचे लॉकेटसह दोन चैन, दोन पांढऱ्या धातुच्या अंगठ्या, एक पिवळ्या धातुची बाजऊ चैन, दोन लेडीज घड्याळ, नगदी ७२० रूपये, मोबाईल हॅन्डसेट आढळून आले. मोटर सायकलची तपासणी केली असता सिटखाली घरफोडी करण्याचे साहित्य यामध्ये एक लोखंडी रॉड, एक धारदार चाकू, एक लाकडी मूठ असलेला कोयता, नॉयलॉन दोरी आढळून आली. दोघांनाही ताब्यात घेवून अटक करण्यात आली. (वार्ताहर)
धारदार शस्त्रासह दोन चोरट्यांना अटक
By admin | Updated: October 21, 2014 22:46 IST