शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

रेती घाटावरील दोन पोकलँडची चोरी

By admin | Updated: July 6, 2017 00:36 IST

रेतीचे अवैध उत्खनन करण्याप्रकरणी तुमसर तहसीलदार गजेंद्र बालपांडे यांनी दोन पोकलँडवर कारवाई केली.

तुमसर तालुक्यातील प्रकार : गोबरवाही पोलिसात तक्रार दाखललोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : रेतीचे अवैध उत्खनन करण्याप्रकरणी तुमसर तहसीलदार गजेंद्र बालपांडे यांनी दोन पोकलँडवर कारवाई केली. सरकारी ताब्यातील हे दोनही पोकलँड चोरीला गेले. या प्रकरणाने प्रशासनात प्रचंड खळबड उडाली आहे. याप्रकरणी गोबरवाही पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तुमसर तालुक्यातील देवनारा रेतीघाटावर रेती माफियांनी मागील काही दिवसांपासून उच्छाद मांडला आहे. रेती उत्खननाची परवानगी नसतानाही अवैधरित्या येथे पोकलँड मशीनच्या माध्यमातून रेती माफिया राजरोसपणे रेतीचे उत्खनन करीत आहे. या माहितीवरून तुमसरचे तहसीलदार गजेंद्र बालपांडे यांनी १ जुलैला दुपारच्या सुमारास देवनारा रेतीघाटावर पोहचले. यावेळी त्यांच्यासह त्यांचे अधीनस्थ कर्मचारी होते. यावेळी त्यांना मॉडेल आर २१५ एलसी सात सीरीयल नंबर एन ६०३ सी ११६२४ हा पिवळ्या रंगाचा तर टाटा हिटाची नंबर ईएक्स २१० एलसीएच व्ही केसरी रंगाची असे दोन पोकलँड मशीनच्या माध्यमातून रेतीचे उत्खनन करीत असल्याचे आढळून आले. या दोन्ही मशीनवर तहसीलदार बालपांडे यांनी कारवाई केली. घटनास्थळाचा पंचनामा करून दोनही पोकलँड मशीन जप्त केले. त्यानंतर देवनाराचे पोलीस पाटील सुधाकर कोरडे यांना सुपूर्द नाम्यावर दोनही मशीनची जबाबदारी सोपविली. एक तारखेला करण्यात आलेल्या तारखेनंतर हे दोनही मशीन देवनारा रेतीघाटालगत नदीपात्रापासून एक कि़मी. अंतरावर ठेवण्यात आले होते. दोन तारखेला सकाळी पोलीस पाटील कोरडे हे पोकलँड ठेवलेल्या ठिकाणी गेले असता त्यांना दोन्ही पोकलँड दिसून आले नाही. याची माहिती त्यांनी तातडीने तुमसर तहसीलदार बालपांडे यांना दिली. या मशीन चोरी प्रकरणी पोलीस पाटील कोरडे यांनी गोबरवाही पोलीस ठाण्यात अज्ञात पोकलँड मशीन चोरांविरूद्ध तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून गोबरवाही पोलिसांनी भादंवी ३७९, १८८ कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. सरकारी ताब्यातील दोन पोकलँड मशीनची चोरी झाल्याचे जिल्ह्यातील हे पहिलेच प्रकरण आहे. या प्रकरणाने प्रशासकीय यंत्रणेची धावपळ सुरू झाली आहे. पोकलँड मशीनच्या माध्यमातून रेतीचे उत्खनन सुरू होते. त्यामुळे या दोन्ही मशीनवर कारवाई करण्यात आली. त्यासंबंधात पंचनामा केला. या पंचनाम्याचे सर्व कागदपत्रे पोलिसांना दिले आहे. पोकलँड चोरी प्रकरणात दोषींवर तातडीने कारवाई होण्यासाठी सहकार्य करू.-गजेंद्र बालपांडे, तहसीलदार तुमसर.