शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

तुमसर उपजिल्हा रुग्णालयात एका बेडवर दोन रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 22:06 IST

तालुक्यात संसर्गजन्य आजाराने डोके वर काढले असून येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी रुग्णांची गर्दी झाली आहे. १०० खाटांच्या या रुग्णालयात सध्या १५० ते १६० रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे एका बेडवर दोन रुग्णांवर उपचार करण्याची वेळ आली आहे. मात्र त्यामुळे रुग्णांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देसंसर्गजन्य आजार बळावले : १०० खाटांच्या रुग्णालयात १५० वर रुग्ण उपचारासाठी दाखल

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तालुक्यात संसर्गजन्य आजाराने डोके वर काढले असून येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी रुग्णांची गर्दी झाली आहे. १०० खाटांच्या या रुग्णालयात सध्या १५० ते १६० रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे एका बेडवर दोन रुग्णांवर उपचार करण्याची वेळ आली आहे. मात्र त्यामुळे रुग्णांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे.तुमसर येथे सुभाष चंद्रबोस उपजिल्हा रुग्णालय आहे. गत आठ-दहा दिवसांपासून या रुग्णालयात रुग्णसंख्या प्रचंड वाढली आहे. वातावरणातील बदल आणि वाढत्या तापमानाने संसर्गजन्य आजार वाढले आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या खाटांची क्षमता १०० आहे. मात्र रुग्णालयात १५० ते १६० रुग्ण उपचारासाठी दाखल आहे. त्यामुळे एका बेडवर दोन रुग्णांवर उपचार करावे लागत आहे. रुग्णालय प्रशासन कुणाला नाही म्हणून शकत नाही. त्यांचा नाईलाज असल्याने एका खाटेवर दोन रुग्णांची सोय करण्यात आली. परंतु याचा मन:स्ताप रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना होत आहे. तसेच संसर्गजन्य आजार रुग्णालयातही पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.तुमसर येथील रुग्णालयात तुमसर तालुक्यास मध्यप्रदेशातील रुग्ण उपचारासाठी येतात. सुमारे अडीच लाख नागरिकांच्या आरोग्याची काळजी सदर रुग्णालय घेत आहे. राज्यस्तरावर या रुग्णालयाला आतापर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहे.जागतिक बँकेच्या सहकार्याने तीन कोटींच्या निधीतून १०० खाटांचे रुग्णालय बांधण्यात आले. परंतु वाढती लोकसंख्या आणि आजाराचे वाढते प्रमाण त्यामुळे खाटांची संख्या कमी पडत आहे. अशास्थितीत १५० खाटांचे रुग्णालय करण्याची गरज आहे. परंतु याबाबत कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने रुग्णांना मन:स्ताप सहन करावा लागतो.यासंदर्भात रुग्णालयाच्या अधीक्षीका डॉ. कल्पना म्हसकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मोबाईलवर प्रतिसाद दिला नाही. तर युवक काँग्रेसचे नेते डॉ. पंकज कारेमोरे म्हणाले, आरोग्य सुविधा पुरविणे ही शासनाची नैतिक जबाबदारी असून उपजिल्हा रुग्णालयात तात्काळ किमान ५० खाटा वाढविण्याची गरज आहे. मात्र शासन आणि प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याचे त्यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.बाह्यरुग्ण विभागात रांगासध्या तालुक्यात ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी आदी आजाराने डोके वर काढले आहे. गावागावातील रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात धाव घेत आहे. त्यामुळे बाह्य रुग्णविभागात रुग्णांची लांब रांग लागलेली दिसून येते. अनेक रुग्ण उपचारासाठी येथे दिवसभर ताटकळत असतात.