शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जंगल सफारीसाठी होणार दोन नवे मार्ग

By admin | Updated: March 26, 2017 00:19 IST

उमरेड-कऱ्हांडला व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात पर्यटकांची संख्या वाढावी यासाठी नवे दोन प्रवेशद्वार होणार आहेत.

भुयार व वाहीला प्रवेशद्वार : उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यामुळे पर्यटकांच्या संख्येत वाढप्रशांत देसाई भंडाराउमरेड-कऱ्हांडला व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात पर्यटकांची संख्या वाढावी यासाठी नवे दोन प्रवेशद्वार होणार आहेत. याबाबत वनविभागाने भुयार व वाही येथून पर्यटकांसाठी प्रवेशद्वार ठेवण्याचे चिन्हांकित केले आहे. यामुळे भंडारा जिल्ह्यातील निसर्ग पर्यटकांच्या संख्येत वाढ होणार आहे.नागपूर जिल्ह्यातील उमरेड-कऱ्हांडला या व्याघ्र प्रकल्पाच्या सीमा भंडारा जिल्ह्यातील पवनी जंगलालगत आहेत. पवनी येथील वनक्षेत्र हे प्रादेशिक वनविभागाच्या अखत्यारित आहे. त्यालगत असलेल्या उमरेड-कऱ्हांडला या महत्त्वाकांक्षी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमा लागून आहेत. येथून पाच कि.मी. अंतरावर हे वन्यजीव कोअर एरिया आहे. पवनी तालुक्यात वाघ, बिबट या प्राण्यांसह सांबर, हरिण, रोही व अन्य प्राण्यांचाही अधिवास आहे. यामुळे या क्षेत्रात निसर्ग पर्यटनाला मोठा वाव आहे. उमरेड कऱ्हांडला व्याघ्र प्रकल्पात पर्यटक मोठ्या संख्येने येतात. या पर्यटकांना पवनी येथील बफर क्षेत्रातील निसर्ग पर्यटनाचा लाभ घेता यावा यासाठी भुयार व वाही येथे प्रवेशद्वार सुरु करण्याचे संकेत वनविभागाने चिन्हांकित केले आहे. पवनी वनविभागांतर्गत सावरला येथे ग्रामवन समिती तर कन्हाळगाव येथील संयुक्त वनव्यवस्थापन समिती हे निसर्ग पर्यटन संकुलाची व्यवस्था सांभाळणार आहेत. ४० ते ५० कि.मी.चे हे जंगल सफारी राहणार आहे. या रस्त्याला वनविभागाने चिन्हांकीत करून तसा प्रस्ताव तयार केला आहे. उमरेड - कऱ्हांडलामुळे या वनक्षेत्राचा पर्यटनवाढीसाठी लाभ होणार आहे. येथे राहणार प्रवेशद्वारनागपूर-चंद्रपूर महामार्गावरील पवनी तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या भुयार येथे एक प्रवेशद्वार तर पवनी तालुक्यातील वाही येथे दुसरे प्रवेशद्वार राहणार आहे. चंद्रपूर व उमरेडमार्गे येणाऱ्या पर्यटकांना भुयार प्रवेशद्वारावरून प्रवेश करता येईल. तर भंडारा येथून येणाऱ्या पर्यटकांना वाही प्रवेशद्वारावरून प्रवेश मिळणार आहे. नाईट सफारीचाही मानसपेंच व नागलवाडी या व्याघ्र प्रकल्पात नाईट सफारीचा आनंद पर्यटक घेत आहेत. याच धर्तीवर पवनी येथील निसर्ग पर्यटन रात्रीच्या वेळी बघता यावे, या दृष्टीनेही ‘नाईट सफारी’ सुरु करण्याचा वनविभागाचा मानस आहे. त्यादृष्टीने वनविभागाने तयारी चालविली असून येत्या काही दिवसातच पवनी क्षेत्रातील प्रादेशिक वनविभागाचा बफर झोनमध्ये समावेश होणार असून त्याकरिता केंद्र सरकारच्या मंजुरीची प्रतिक्षा आहे. यानंतर या क्षेत्राचा कायापालट होईल, असा मानस वनविभागाने व्यक्त केला आहे.निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून वनविभागाच्या क्षेत्रातील गावांचा आर्थिक व अन्य साधनसामुग्रीच्या दृष्टीने विकास व्हावा यासाठी निसर्ग पर्यटन संकुलाची निर्मिती करण्यात येणार आहे. नवीन जंगल सफारीकरीता दोन रस्ते चिन्हांकीत केले आहे. येत्या काही दिवसात ते पर्यटकांसाठी खुले होतील. - उमेश वर्मा,उपवनसंरक्षक, भंडारा