शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाख ६५ हजार बालकांचे रूबेला-गोवर लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 22:21 IST

गोवर आजाराचे दुरीकरण व रूबेला आजारावर नियंत्रण मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील शाळा व अंगणवाडीतील दोन लाख ६५ हजार हजार ८५४ बालकांना गोवर-रूबेला लस देण्यात येणार आहे. पाच आठवडे चालणाऱ्या या मोहिमेचा शुभारंभ २७ नोव्हेंबररोजी होणार आहे. ही लस अत्यंत सुरक्षीत असून या मोहिमेत पालक शिक्षक व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.

ठळक मुद्देशांतनू गोयल : २७ नोव्हेंबरपासून लसीकरण, पाच आठवडे चालणार मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गोवर आजाराचे दुरीकरण व रूबेला आजारावर नियंत्रण मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील शाळा व अंगणवाडीतील दोन लाख ६५ हजार हजार ८५४ बालकांना गोवर-रूबेला लस देण्यात येणार आहे. पाच आठवडे चालणाऱ्या या मोहिमेचा शुभारंभ २७ नोव्हेंबररोजी होणार आहे. ही लस अत्यंत सुरक्षीत असून या मोहिमेत पालक शिक्षक व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.गोवर-रूबेला लसीकरण मोहिमेचा कालावधी चार ते पाच आठवड्याचा आहे. पहिला व दुसरा आठवडा शैक्षणिक संस्था व शाळा-अंगणवाड्यांमध्ये लसीकरण केले जाणार आहे. तिसºया व चवथ्या आठवड्यात आरोग्यसेवा व संस्था आणि इतर बाह्य संपर्क व मोबाईल संस्थांद्वारे तर पाचव्या आठवड्यात गोवर-रूबेला लसीकरणातून सुटलेल्या लाभार्थ्यांसाठी लसीकरण सत्र आयोजित केले जाणार आहे.भंडारा जिल्ह्यात नऊ महिले ते १५ वर्ष वयोगटातील दोन लाख ६५ हजार ८५४ मुला-मुलींना लस देण्यात येणार आहे. ही लस १४२८ शाळा व १४१७ अंगणवाड्यांमधून देण्यात येईल. यासाठी १७७२ लसीकरण सत्र घेण्यात येणार आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून विद्यार्थी व पालकांच्या बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यातून मोहिमेविषयी जनजागृती करण्यात येईल. रूबेलाची लस अत्यंत सुरक्षित असून अपवादात्मकरित्या उद्भवलेल्या प्रसंगासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची चमू सुद्धा प्रत्येक ठिकाणी उपलब्ध केली जाणार आहे. मोहिमेसाठी पुरेशी लस उपलब्ध झाली आहे. पालकांनी घाबरून न जाता आपल्या मुलांना गोवर-रूबेला लसीकरण करावे, असे आवाहन जिल्हाधिकाºयांनी केले आहे.आरोग्य विभाग, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण विभागांमार्फत ही मोहीम राबविली जाणार आहे. यात इंडियन मेडिकल असोसिएशन, रेडक्रॉस सोसायटी, सेवाभावी संस्था यांचा सक्रीय सहभाग राहणार आहे. खाजगी शैक्षणिक संस्था व इंग्रजी माध्यमाच्या शाळांतील शिक्षकांनी ही मोहिम राबविण्यासाठी स्वत:हून पुढाकार घेतला आहे, असे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी थोरात, जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके, आयएमएचे डॉ. अशोक ब्राम्हणकर, डॉ. मेश्राम, डॉ. माधुरी माथुरकर उपस्थित होते.बोटाला शाई आणि कार्डया मोहिमेत ज्या विद्यार्थ्यांना लस दिली जाईल त्यांच्या बोटाला शाई लावण्यात येईल. तसेच लस दिल्याचे कार्ड देण्यात येणार आहे. सोबत प्रत्येक लसीकरण केंद्रावर वैद्यकीय सुरक्षा कीट उपलब्ध असणार आहे. ही मोहिम शंभर टक्के यशस्वी करण्याचे नियोजन करण्यात आले असून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांनी केले आहे.