शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

दोन दिवसात दोन अल्पवयीन मुलींना पळविले

By admin | Updated: May 11, 2016 00:50 IST

दोन अल्पवयीन मुलींना फुस लावून पळवून नेले. ही घटना भंडारा शहरातील दोन वेगवेगळ्या वॉर्डात घडली. या घटनेमुळे शहरातील पालकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

भंडारा शहरातील घटना : पालकांमध्ये भीतीचे वातावरणभंडारा : दोन अल्पवयीन मुलींना फुस लावून पळवून नेले. ही घटना भंडारा शहरातील दोन वेगवेगळ्या वॉर्डात घडली. या घटनेमुळे शहरातील पालकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.मागील काही दिवसांपासून शहरातच नव्हे तर जिल्ह्यात अल्पवयीन मुलींना पळूवन नेल्याच्या घटना घडत आहेत. अशा घटनांवर आळा बसावा यासाठी ‘दामिनी’ पथकाची निर्मिती करण्यात आलेली आहे. असे असतानाही अल्पवयीन मुलींना पळविण्याच्या घटनेत घट झालेली नाही.भंडारा शहरातील दोन वेगवेगळ्या वॉर्डातील दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेले. यातील एक घटना जमनालाल बजाज वॉर्डात घडली आहे. फुस लावून एका १६ वर्षीय अल्पवयीन पळवून नेले. ती फिर्यादीच्या घरी मागील पाच वर्षापासून राहत होती. रविवारला तिला अज्ञात व्यक्तीने पळूवन नेले. बराच वेळानंतर ती घरी परतली नाही. त्यामुळे फिर्यादीने अज्ञात आरोपीविरूध्द अल्पवयीन मुलीला पळूवन नेल्याची तक्रार भंडारा पोलिसात दाखल केली. तपास पोलीस हवालदार कावळे करीत आहे.दुसरी घटना खात रोडवरील वैशालीनगर येथील आहे. १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी फिर्यादीची नात आहे. सोमवारला ही मुलगी सायकलने घराबाहेर पडली. यावेळी तिने तासभरात घरी परतेल असे कुटुंबियांना सांगितले. मात्र, बराच वेळ होवूनही ती घरी परतली नाही. त्यामुळे तिच्या आजोबाच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा नोंदविला आहे. सलग दोन दिवसात दोन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तींनी फुस लावून पळवून नेल्याची घटना घडली. यामुळे पालकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. (शहर प्रतिनिधी)