आरोपी मोकाटच : प्रकरण कोष्टी येथील तरुणाच्या खुनाचे तुमसर : कोष्टी शेतशिवारात युवकाचा खून प्रकरणात पोलिसांनी येथील चार संशयितांना ताब्यात घेतले. तब्बल चार दिवस लोटूनही ठोस कारवाई झाली नाही. नागपूर येथील फॉरेन्सीक लॅबचा अहवाल दोन दिवसानंतर येणार आहे. १५ जुलैला विनोद अशोक धुर्वे (२८) रा. देव्हाडी यांचा मृतदेह कोष्टी शेतशिवारातील एका विहिरीत हात बांधलेल्या स्थितीत गळफास लावल्याल्या संशयास्पद स्थितीत आढळला होता. तुमसर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द भांदवी ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी देव्हाडी येथील चार जणांना संशयित म्हणून ताब्यात घेतले.नागपूर येथे शासकीय रुग्णालयात फॉरेन्सीक लॅबमध्ये त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. त्याचा अहवाल दोन ते तीन दिवसांनी प्राप्त होणार आहे. त्यानंतर तपासाची दिशा निश्चित होण्याची शक्यता आहे. गळा आवळल्याने विनोदचा मृत्यू झाला. पंरतु प्रथम मृत्यू व नंतर गळफास लावण्यात आला काय? याची माहिती फॉरेन्सीक लॅबच्या अहवालातून स्पष्ट होईल. चंदन तस्कर रॅकेट कोष्टी व परिसरातील शेतात मौल्यवान चंदनाची झाडे आहेत. या झाडांची कापणी करुन मोठ्या किंमतीत ही झाडे विकली जायची. हे रॅकेट सक्रीय आहे. हा सर्व अवैध व्यवसाय अत्यंत गोपनीय पध्दतीने सुरु आहे. ता विनोद तिथे नेमकी कशाला गेला हे गुढ पोलिसांना कळले नाही. (तालुका प्रतिनिधी)
दोन दिवसानंतर ‘फॉरेन्सिक रिपोर्ट’
By admin | Updated: July 18, 2016 01:34 IST