शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
2
रशियाच्या बदल्यानं युक्रेन हादरलं! ४०० ड्रोन अन् ४० हून अधिक मिसाईल हल्ल्यानं सगळीकडे विनाश
3
एकीकडे युतीची चर्चा, पण दुसरीकडे मनसेचा बडा नेता मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन
4
Makarand Anaspure : ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मकरंद अनासपुरेंनीही केलं होतं भाष्य, म्हणालेले की, "मराठी माणूस..."
5
Narendra Modi : "तो कुटुंबासाठी कष्ट करत होता, दहशतवाद्यांनी त्याला मारलं"; आदिलच्या आठवणीत मोदी भावुक
6
आजीच्याच शाळेत जातोय नातू...! पृथ्वी अंबानीच्या शाळेचे नाव काय, फी किती? डोळेच विस्फारतील...
7
'मला अशा मुली आवडत नाहीत, ज्या...'; भाजप नेत्याचे कपड्यांबद्दल वादग्रस्त विधान
8
Lord Hanuman : हनुमंताला पाच भाऊ होते, तेही विवाहित; काय होती त्यांची नावे? जाणून घ्या!
9
iPhone युजर्ससाठी खूशखबर! ट्रम्प यांच्या धमकीनंतरही Apple नं टाटांना सोपावलं दुरुस्तीचं काम
10
छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींचा कडेलोट करा: हर्षवर्धन सपकाळ
11
Gold Price Today: सोनं झालं स्वस्त, खरेदीपूर्वी जाणून घ्या काय आहेत नवे दर?
12
पाकिस्तानने हेरगिरीसाठी महिलांचीच निवड का केली? गद्दार तुफैल-हारूनने चौकशीत सांगून टाकलं!
13
आधी आईनं गळा आवळला, त्यानंतर मामानं...; बारावीत शिकणाऱ्या मुलीसोबत घडलं भयंकर!
14
पाकिस्तानला भारतात दंगली घडवायच्या होत्या, पण..; जम्मू-काश्मीरमधून PM मोदींचा पाकला इशारा
15
"साहेब, परप्रांतियांची दादागिरी वाढली, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे", कार्यकर्त्यांची 'मनसे' भावना; राज ठाकरे काय म्हणाले?
16
रेपो रेटचा डबल धमाका! व्याजापोटीचे १.४८ लाख वाचणार, त्यातून ईलेक्ट्रीक स्कूटर घेतली तर आणखी... 
17
प्रामाणिकपणा काय असतो? ते या डॉगीकडून शिका! जीवाची पर्वा न करता मालकाच्या मुलाला वाचवलं; सापानं अनेक वेळा घेतला चावा, पण... 
18
ट्रम्प आणि मस्क यांच्यात वाद; Tesla चे शेअर्स जोरदार आपटले, १५२ अब्ज डॉलर्स बुडाले
19
RCB चेंगराचेंगरी प्रकरणात पहिली अटक; कोण आहे न‍िख‍िल सोसाले? त्या घटनेत महत्वाची भूमिका
20
सदाशिव अमरापूरकर यांच्या मुलीने गाजवलंय बॉलिवूड! रितेश देशमुखसोबत 'या' सिनेमासाठी केलंय काम

जिल्ह्यात शनिवारी आढळले दोन कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 05:01 IST

जिल्हा प्रशासनाने सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास जिल्ह्यात नव्याने दोन कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण आढळल्याचे जाहीर केले. हे दोन्ही व्यक्ती पुणे येथून भंडारा येथे आले आहेत. त्यांनी जेव्हा भंडारात प्रवेश केला तेव्हाच त्यांना इन्स्टीट्युशन क्वारंटाईन करण्यात आले होते. याच दरम्यान या दोघांचे घशांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले होते.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासन अलर्ट । ७५४ नमुन्यांपैकी ६८९ नमुने निगेटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आधी ग्रीन व नंतर ऑरेंज झोनमध्ये आल्यानंतर एकमेव पॉझीटिव्ह असलेली कोरोनाबाधीत महिला रुग्ण तपासणीनंतर पुन्हा निगेटिव्ह घोषित करण्यात आली. परंतु तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांपैकी शनिवारी दोन जणांचे अहवाल पॉझीटिव्ह आले आहेत. सदर दोन रूग्ण आढळल्यानंतर जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे.जिल्हा प्रशासनाने सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास जिल्ह्यात नव्याने दोन कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण आढळल्याचे जाहीर केले. हे दोन्ही व्यक्ती पुणे येथून भंडारा येथे आले आहेत. त्यांनी जेव्हा भंडारात प्रवेश केला तेव्हाच त्यांना इन्स्टीट्युशन क्वारंटाईन करण्यात आले होते. याच दरम्यान या दोघांचे घशांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले होते. शनिवारी दोघांचे नमुने पॉझीटिव्ह आले आहेत.मात्र सदर दोन्ही रुग्ण पुणे येथून कोणत्या भागातून आले व भंडारा येथे कुठे राहतात याची माहिती नाही. याबाबत रविवारी सकाळी ११ वाजता जिल्हा प्रशासनातर्फे कोरोना संसर्ग झालेल्या दोन्ही इसमांची माहिती देणार असल्याचे सांगण्यात आले आहे. संक्रमीत व्यक्ती महिला की पुरुष याबाबतही माहिती नाही. आॅरेंज झोनमधून पुन्हा ग्रीन झोनमध्ये भंडारा जिल्हा जाणार अशी चिन्हे असताना दोन रुग्ण आढळल्यामुळे जिल्हा आॅरेंज झोनमध्ये राहणार आहे.जिल्ह्यात आतापर्यंत मुंबई, पुणे व इतर राज्यातून ३२ हजार ०६५ व्यक्ती आले आहेत. यापैकी २३ हजार ३६५ व्यक्तींचा होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. तसेच ८ हजार ७०० व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले असून घराबाहेर पडू नये अशी ताकीदही देण्यात आली आहे. शुक्रवारी ६४ व्यक्तींचे घशातील नमुने नागपूर येथे पाठविण्यात आले होते. त्यापैकी सर्वच अहवाल अप्राप्त आहेत. आतापर्यंत ७५४ नमुन्यांपैकी ६८९ नमुने निगेटिव्ह असून तीन नमुने पॉझीटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ४७५ व्यक्तींना हॉस्पीटल क्वारंटाईन तर २२३ जणांना आयसोलेशन वॉर्डातून सुटी देण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या