शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वाघाच्या शिकारप्रकरणी दाेघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2022 05:00 IST

अटक केलेल्या बापलेकाला रविवारी तुमसर येथील प्रथम श्रेणी न्यायाधीशांसमाेर हजर करण्यात आले. गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याचे निरीक्षण नाेंदवित दाेघांनाही पाच दिवसांची वनकाेठडी ठाेठावली. तपासादरम्यान तुळशीराम लिल्हारे यांच्या शेतातून काही वन्यप्राण्यांची हाडे, कवटी, करंट लावण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खुंट्या व इतर साहित्य वनाधिकाऱ्यांनी जप्त केल्या आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वाघाची शिकार करून  बावनथडीच्या वितरिकेत मृतदेह फेकूण दिल्याच्या कारणावरून तपासाअंती वनविभागाने दाेन जणांना अटक केली आहे. अटक केलेले बाप-लेक असून तुळशीराम दशरथ लिल्हारे व शशिकांत लिल्हारे अशी या आराेपींची नावे आहे. रविवारी तुमसर न्यायालयाने या बापलेकांना पाच दिवसांची वनकाेठडी ठाेठावली आहे.बावनथडीच्या वितरिकेत ३१ मार्चच्या सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास दाेन वयाेवर्ष असलेला वाघ  मृतावस्थेत आढळला हाेता. वनविभागाने याप्रकरणी प्रारंभीला अन्य प्राण्यांसाेबत झालेल्या झुंजीत वाघाचा मृत्यू झाल्याचा कांगावा केला हाेता. मात्र अनुभवी वैद्यकीय तज्ज्ञांच्या चमूने या वाघाची शिकारच असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले हाेते. साकाेलीचे पशुधन विकास अधिकारी डाॅ. गुणवंत भडके यांनी तर चक्क ही वाघाची शिकार असल्याचे सुताेवाच केले हाेते. त्यांच्या अनुभवाचे बाेलही वनविभागाने गांभीर्याने घेतले नाही. प्रकरण दडपायचे की समाेर आणायचे याच विवंचनेत अधिकारी हाेते की काय असे वाटत हाेते. मात्र ‘लाेकमत’च्या वृत्ताने वनविभाग खळबडून जागा झाला.तपासाचे सूत्रे वेगवाणरीतीने फिरवित बपेरातील पाच जणांना चाैकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, तुळशीराम व शशिकांत लिल्हारे या बापलेकांचा या घटनेत प्रत्यक्ष सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. अटक केलेल्या बापलेकाला रविवारी तुमसर येथील प्रथम श्रेणी न्यायाधीशांसमाेर हजर करण्यात आले. गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याचे निरीक्षण नाेंदवित दाेघांनाही पाच दिवसांची वनकाेठडी ठाेठावली. तपासादरम्यान तुळशीराम लिल्हारे यांच्या शेतातून काही वन्यप्राण्यांची हाडे, कवटी, करंट लावण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खुंट्या व इतर साहित्य वनाधिकाऱ्यांनी जप्त केल्या आहे.संपूर्ण घटनाचक्रात तपास अधिकारी एसीएफ साकेत शेंडे, नाकाडाेगरीचे वनपरिक्षेत्राधिकारी मनाेज माेहिते, तुमसरचे वनपरिक्षेत्राधिकारी गाेविंद लुचे, भरारी पथकाचे वनपरिक्षेत्राधिकारी संजय मेंढे यासह अन्य कर्मचारी व पाेलीस विभागाने सहकार्य केले.

अशी झाली वाघाची हत्या...- वनविभागाच्या तपासात आराेपीच्या शेतात वाघाच्या पायाचे ठसे आढळून आले हाेते. याशिवाय आराेपींनी विद्युत प्रवाहाचा वापर करुन वाघाची शिकार केली. आपल्यावर आड येवू नये म्हणून बैलबंडीच्या सहाय्याने वाघाचा मृतदेह बावनथडीच्या वितरिकेत नेवून फेकुण देण्यात आला. प्रत्यक्षरित्या वाघाची ही हत्याच असून जंगलातील अन्न साखळीतील एक महत्वाचा सर्वाेच्च घटक असून परिस्थितीकीय संतुलन राखण्यात वाघाचे माेठे याेगदान आहे. परिणामी ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब असल्याचेही या निमित्ताने समाेर आले. वाघाची शिकार करणाऱ्या आराेपींना तीन ते सात वर्ष कारावास हाेवू शकताे, अशी शिक्षेचे प्रावधान आहे.

बपेरा येथील वाघाच्या शिकार प्रकरणातील आराेपींना कठाेर शिक्षा हाेईल याकरिता वनविभाग सर्वाेताेपरी प्रयत्न करणार आहे. शेतकरी बांधवांनी विद्युत करंटच्या साहाय्याने कुठल्याही वन्यप्राण्यांची शिकार हाेऊ नये याची काळजी घ्यावी. - राहुल गवई,उपवनसंरक्षक वनविभाग, भंडारा

 

टॅग्स :Tigerवाघ