शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

मोहफुलातून कोट्यवधींची उलाढाल; मात्र भंडारा जिल्ह्यात एकही प्रक्रिया उद्योग नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 13:33 IST

शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा मोहवृक्ष हा कल्पवृक्षच आहे. दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल या वृक्षातून होत असते. त्यातील ९० टक्के फुलांचा वापर दारूसाठी होतो. या कल्पवृक्षाला राजाश्रय मिळाल्यास शासनाच्या महसुलात भर पडेलच, शिवाय शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासही मदत होईल.

ठळक मुद्देकल्पवृक्षाला राजाश्रय केव्हा मिळणार, लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा :  शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा मोहवृक्ष हा कल्पवृक्षच आहे. दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल या वृक्षातून होत असते. त्यातील ९० टक्के फुलांचा वापर दारूसाठी होतो. या कल्पवृक्षाला राजाश्रय मिळाल्यास शासनाच्या महसुलात भर पडेलच, शिवाय शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासही मदत होईल.दरवर्षी मार्च ते मे या कालावधीत मोहाच्या झाडाला फुले येतात. पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांसह अन्य जिल्ह्यात ही झाडे मोठ्या प्रमाणात आढळून येतात. एका झाडापासून सुमारे ५० किलो फुले मिळतात. ही फुले साधारणत: २० ते २५ रुपये प्रती किलो दराने विकली जातात. एकट्या भंडारा जिल्ह्यात या झाडातून १०० टन फुलांचे उत्पादन होते. २५ रुपये प्रती किलोने हिशोब केला तर हा आकडा कोट्यवधीच्या घरात जातो. इतक्या प्रचंड प्रमाणात मोहफुलांचे उत्पादन होत असले तरी पूर्व विदर्भात त्यावर आधारीत एकही प्रक्रिया उद्योग नाही. राज्यात ऊस, द्राक्षांपासून दारू तयार केली जाते. त्या दारुला शासनाची मान्यता आहे. परंतु, हीच दारू मोहफुलापासून तयार केली तर त्याला शासनाकडून मान्यता मिळत नाही, हा विरोधाभास आहे. ग्रामीण भागात ज्यांच्याकडे उपजिविकेचे कोणतेही साधन नाही ते मोहफुलाच्या दारूचा व्यवसाय करतात. यात प्रामुख्याने महिलांचा समावेश असतो. घरात कर्ता पुरुष नसल्याने नाईलाजाने त्यांना हा व्यवसाय करावा लागतो, ही वस्तुस्थिती आहे. मोहवृक्षांचे संगोपण करण्यासाठी कुठलाही खर्च येत नाही. पावसाळ्याच्या पाण्यावरच ते वर्षभर जगतात. कोणतेही उत्पादन खर्च नसताना हा मोहवृक्ष शासनदरबारी दुर्लक्षितच आहे.लॉकडाऊनमुळे वाढले मोहफुलाचे भावभंडारा जिल्ह्यात मोहफुलांचा वापर मुख्यत्वे दारु काढण्यासाठी केला जातो. साधारणत: २५ रुपये किलोप्रमाणे या फुलांची विक्री होते. परंतु, लॉकडाऊनमुळे देशी विदेशी दारुची विक्री बंद झाल्याने मद्य शौकींनाचा कल मोहफुलाच्या दारुकडे वळला. कधी नव्हे इतकी मोहफुलाच्या दारुची विक्री मागील दीड महिन्यात झाली. त्यामुळेच मोहफुलाचे दरही प्रचंड वाढविण्यात आले. २५ रुपये किलोप्रमाणे मिळणारे मोहफुल आता थेट ५० रुपये किलोप्रमाणे विकले जात आहे. परिणामी, मोहफुलाच्या दारुचेही दर वाढले आहेत.खाद्यान्नातून दारु निर्मितीची गरजदेशात आणखी काही वर्ष पुरेल एवढा अन्नसाठा आहे. अनेकदा गोदामांमध्ये अन्न सडत असते. परंतु, त्यावर प्रक्रिया केली जात नाही. विदेशात अन्नधान्यापासून रिफार्इंड दारुची निर्मिती केली जाते. परंतु, भारतात अन्नधान्याची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत असूनही त्याकडे दुर्लक्ष आहे. गत पाच वर्षांपासून अन्नधान्याच्या किंमती स्थिर आहेत. बाजारात उठाव नसल्याने शेतकऱ्यांच्या मेहनतीला भाव मिळत नाही. त्यामुळे अन्नधान्यातून दारुची निर्मिती केल्यास शेतकऱ्यांच्या मालाला उठाव येईल व त्यातून त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल.बेरोजगारांना मिळणार रोजगारभंडारा जिल्ह्यात उद्योगांची वाणवा असल्याने येथे बेरोजगारांची फौज आहे. हाताला काम नसल्याने बहुतांश युवक रेती तस्करी, अवैध दारु आदी कामात गुंतले आहेत. या जिल्ह्यात मोहफुलावर आधारीत उद्योगासाठी पोषक वातावरण असून लोकप्रतिनिधींनी यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. मोहफुलावर उद्योगनिर्मिती झाल्यास बेरोजगारांनाही रोजगार मिळेल.-चंद्रकांत खाडे, जिल्हा पणन अधिकारी भंडारा.

 

 

टॅग्स :agricultureशेती