शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

वीज कडाडताच मोबाईल करा बंद, झाडांपासून राहा दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:27 IST

भंडारा : पावसाळ्यात वीज कोसळण्याच्या घटना वाढू शकतात. वीज कडाडताच मोबाईल बंद करावा, झाडांपासून दूर राहावे, असे आवाहन ...

भंडारा : पावसाळ्यात वीज कोसळण्याच्या घटना वाढू शकतात. वीज कडाडताच मोबाईल बंद करावा, झाडांपासून दूर राहावे, असे आवाहन जीवितहानी व वित्तहानी टाळण्याच्या दृष्टीने आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात येत आहे.

पावसाळ्यात मुसळधार पावसाची शक्‍यता असते. तसेच शेतीला पावसाची गरज आहे. शेती कामासाठी शेतकरी शेतावर असतात. वीज ही सामान्यतः उंच वस्तूवर पडते. कोणतेही स्थान हे पूर्णपणे सुरक्षित नाही; मात्र काहीच स्थाने हे पूर्णपणे इतर ठिकाणांपेक्षा सुरक्षित असतात. जास्त पाऊस पडणाऱ्या क्षेत्राच्या बाहेरही वज्राघात होऊ शकतो. वज्राघात सतत एकाच ठिकाणी होऊ शकतो. भंडारा जिल्ह्यात गत नऊ वर्षांची आकडेवारी लक्षात घेतली असता ३० जणांचा वीज कोसळून मृत्यू झाला आहे. यात सर्वाधिक मृत्यू २०२१ मध्ये आहेत.

बाॅक्स

वीज पडण्यापूर्वी चेतावणीची चिन्हे

वीज पडण्यापूर्वी काही चेतावनीचे चिन्हे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आलेली आहेत. अतिवेगाने वारे, अतिपर्जन्य आणि काळे ढग, घोंगावणारे गडगडाटासह वादळ, जास्त किंवा अधिक जास्त प्रमाणात मेघगर्जना ही सर्व वादळासह विजेच्या चेतावणीचे चिन्हे आहेत.

बॉक्स

बाहेर पडलेल्या व्यक्तीचेच वज्राघातामुळे नुकसान

सामान्यतः बाहेर पडलेल्या व्यक्तींची वज्राघातामुळे नुकसान होते. बाहेर असलेल्या व्यक्ती वज्राघातामुळे नुकसान होते. बाहेर असलेल्या व्यक्ती जखमी होतात किंवा मृत्यू पावतात. आपल्या भागातील स्थानिक हवामानाविषयी अंदाजाची व सतर्कतेच्या माहितीचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवेत संदर्भात माहिती असणे आवश्यक आहे.

बॉक्स

वीज कडाडत असतानाही घ्या काळजी

विजेवर चालणाऱ्या वस्तू इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल वस्तू आणि वातानुकूलित यंत्रे बंद ठेवण्यात यावीत. विजा चमकत असताना व घराबाहेर असल्यास घराच्या खिडक्या व दरवाजे बंद ठेवावे. मेघगर्जना झाल्यापासून ३० मिनिटे घराच्या आतच राहावे. गडगडाटासह वादळ आल्यास उंच जागांवर मोकळ्या जागा, स्वतंत्र झाडे, रेल्वे, बस, सहलीची आश्रयस्थाने, दळणवळणाची टाॅवर्स, धातूंचे कुंपण, उघडी वाहने आणि पाणी टाळावे, घरात असल्यास विद्युत उपकरणांना हात लावू नये, अशी माहिती आपत्ती विभागाकडून देण्यात आली आहे.