स्थानांतरणाला विरोध : प्रकरण साकोली तहसील कार्यालयाचे साकोली : येथील तहसील कार्यालयाच्या कामाला स्थगिती देण्यात यावी, असे आदेश महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. ही बातमी साकोलीत कळताच आंदोलन बंद करण्यात आले. असे असले तरी गडकुंभली मार्गावरील नवीन तहसील कार्यालयाचे बांधकाम मात्र सुरु आहे.साकोलीत तहसील कार्यालय जुन्याच ठिकाणी बांधण्यात यावे व नवीन सुरु असलेले बांधकाम बंद करण्यात यावे यासाठी साकोली येथे चारदिवसापासून साखळी उपोषण तहसील कार्यालयासमोर सुरु होते. दरम्यान आंदोलनकर्त्यांचे शिष्टमंडळ नागपूर येथील अधिवेशनात महसूल मंत्री एकनाथ खडसे यांची भेट घेतली व निवेदन दिले. या निवेदनावर महसूल मंत्र्यांनी जिल्हाधिकारी यांना बांधकामावर स्थगिती देण्यात यावी असे आदेश दिले. हा आदेश मेलवर काल दि. १२ ला दिसला व साकोली येथील आंदोलकांनी फटाक्यांची आतषबाजी करीत ढोल ताशांच्या गजरात साकोली येथून रॅली काढून गांधीजींच्या पुतळ्याला हार चढविला व आंदोलन बंद केले व दि.१५ ला दुपारी १२ वाजता जाहीर सभेचे आयोजन केले. मात्र ज्यासाठी आंदोलन करण्यात आले ते गडकुंभली रोडवरील बांधकाम आज सुरुच होते. त्यामुळे आतीषबाजी व ढोलताशांचा गरज आंदोलकांनी कशासाठी केला हा प्रश्नच आहे. (तालुका प्रतिनिधी)
आंदोलन बंद, काम सुरुच
By admin | Updated: December 13, 2014 22:33 IST