मकरसंक्रांती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हळदी-कुंकु कार्यक्रमाचे आयोजन रंजिता अकारेमोशरे यांच्यातर्फे करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी रिता हलमारे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून वीणा झंझाड, मनिषा गायधने, प्रतिमा राखडे, हर्षा मलेवार, पुष्पलता मलेवार, मंदा मेहर, तारा हेडाऊ, अरुणा श्रीपाद, सविता मलेवार, रागिणी सेलोकर, वंदना मेश्राम, वेणू गभणे, लीला बडवाईक, वर्षा बारई, सविता बाहे, मनिषा गेडाम, श्वेता येळणे, आकांक्षा वासनिक, भारती तितिरमारे उपस्थित होत्या. कार्यक्रमात समूह नृत्य, एकल नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात समूह नृत्यात प्रथम पुरस्कार देवांशी बांडेबुचे, द्वितीय पुरस्कार खुशी दुपारे, तृतीय पुरस्कार आराध्या रामटेके यांनी पटकविला. तसेच सुंदर परिधानमध्ये प्रथम पुरस्कार शेबेताई, द्वितीय पुरस्कार बावणेताई, प्रोत्साहनपर बक्षीस रेखा हेडाऊ, प्रियंका समरीत, शारदा गायधने, तारा हेडाऊ, प्रतिमा राखडे, नंदा बारई, साक्षी कारेमोरे, कारेमोरे यांना देण्यात आले. संचालन भारती तितिरमारे, तारा हेडाऊ यांनी, तर आभार प्रदर्शन मनिषा गायधने यांनी केले. कार्यक्रमाकरिता युवक राष्ट्रवादी काँग्रेस मोहाडी नगर अध्यक्ष अनूप थोटे, मीनाज शेख़, प्रणय पात्रे, अविनाश कोसरे, मोहाडी नगरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
मोहाडी येथे हळदीकुंकू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:32 IST