शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

तुमसरकरांना गढूळ पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 21:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तुमसर : पाणी जीवन आहे, नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठ्याची हमी स्थानिक प्रशासन घेते, परंतु तुमसरात मागील दोन ...

ठळक मुद्देनगर परिषदेवर धडक : दोन महिन्यांपासून सुरू आहे प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : पाणी जीवन आहे, नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठ्याची हमी स्थानिक प्रशासन घेते, परंतु तुमसरात मागील दोन महिन्यापासून नेहरू, मालवीय व विवेकानंद वॉर्डात गढूळ पाणीपुरवठा केला जात आहे. हे पाणी काळसर रंगाचे असून या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी तर सोडाच पण इतर वापरातही हे पाणी उपयोगी पडत नाही. मंगळवारी स्थानिक वॉर्डातील महिलांनी नगरपरिषदेवर धडक देऊन मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन समस्या मांडून संताप व्यक्त केला.शहरातील नेहरू, मालवीय व विवेकानंद वॉर्ड जूने आहेत. सदर वॉर्डात मागील दोन महिन्यापासून अत्यंत गढूळ पाण्याचा पुरवठा सुरू आहे. नालीतील सांडपाण्यासारखा रंग असलेले पाणी पिण्यासाठी घातक आहे.या पाण्याची दुर्गंधी येत आहे. अगदी काळसर असे दुर्गधीयुक्त असे हे पाणी आहे.सदर समस्या सांगितल्यावरही आतापर्यंत प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले. पुन्हा किती दिवस दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा सुरू राहील, असा जाब विचारण्याकरिता २५ ते ३० महिला पुरूष थेट नगरपरिषदेत पाण्यासह दाखल झाले.मुख्याधिकारी अर्चना मेंढे यांच्या कक्षात बॉटलमध्ये व बादलीत भरून आणलेले पाणी त्यांना दाखविले, असे दुर्गंधीयुक्त व काळसर गढूळ पाणी प्राशन करावे काय, शुद्ध पाणीपुरवठा केव्हा सुरू करणार असा प्रश्न विचारला.तसेच जलवाहिनी दुरूस्तीची कामे केव्हा सुरू करणार असा प्रश्नांचा भडीमार संतप्त नागरिकांनी यावेळी केला. यावेळी महिला-पुरूष संतप्त झाले होते. किमान पाणीपुरवठा तरी नियमित करा, येत्या दोन दिवसात गढूळ पाणीपुरवठा बंद न केल्यास आंदोलनाचा इशारा उपस्थित महिला-पुरूषांनी दिला.शिष्टमंडळात माजी नगरसेवक राजेश देशमुख, नर्मदा मेहर, प्रभा पाटील, जगन्नाथ गायधने, अशोक पाटील, ममता आथीलकर, उमेश लांजेवार, छाया जिभकाटे, वैशाली डाबरे, रूकमा बांगळकर, राजू येळणे, लिला चोपकर, उर्मिला आंबीलढुके, शांतकला गभने, कविता चोपकर, चंदा चोपकर, लता चोपकर यांचा समावेश आहे.