शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

तुमसर-तिरोडी आंतरराज्य पॅसेंजर गाडी अद्यापही लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:39 IST

तुमसर : कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर एक्स्प्रेस गाड्या सुरू झाल्य; मात्र व्यावसायिक आणि प्रवाशांसाठी महत्त्वाची असलेली तुमसर - तिरोडी पॅसेंजर ...

तुमसर : कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर एक्स्प्रेस गाड्या सुरू झाल्य; मात्र व्यावसायिक आणि प्रवाशांसाठी महत्त्वाची असलेली तुमसर - तिरोडी पॅसेंजर गाडी अद्यापही बंदच आहे. लहान स्थानकावरील प्रवाशांची गैरसोय होत असून, बस व इतर वाहनाने प्रवास करावा लागत असल्याने आर्थिक भुर्दंड बसत आहे. मध्य प्रदेशातील नागरिकांचा तुमसरसह इतर शहराचा संपर्क गत दीड वर्षापासून तुटला आहे.

कोरोनाकाळात रेल्वे प्रशासनाने लोकल, पॅसेंजर, एक्स्प्रेस प्रवासी गाड्या बंद केल्या होत्या. त्यानंतर एक्स्प्रेस गाड्या स्पेशल ट्रेन म्हणून सुरू केल्या आहेत. त्यातही आरक्षण व कन्फर्म तिकीट काढूनच प्रवाशांना प्रवास करावा लागतो. परंतु लहान रेल्वेस्थानकात एक्स्प्रेस व स्पेशल ट्रेनला थांबा नाही. त्यामुळे लहान रेल्वेस्थानकातील प्रवाशांना रेल्वेने प्रवास करता येत नाही. अनलॉक सुरू झाल्यानंतरही लोकल व पॅसेंजर गाड्या रेल्वे प्रशासनाने अद्यापही लॉक केल्या आहेत. यासंदर्भात स्थानिक रेल्वे प्रशासनाचे अधिकारी वरिष्ठांकडून आदेश प्राप्त झाले नाहीत असे सांगत आहेत. बस वाहतूक सुरू झाली आहे. परंतु पॅसेंजर गाड्या का सुरू झाल्या नाही, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.

तुमसर - तिरोडी आंतरराज्य प्रवासी गाडी दीड वर्षापासून बंद आहे. या मार्गावर एक्स्प्रेस व स्पेशल गाड्या धावत नाहीत. या मार्गावरील नागरिकांना बसने महागडा प्रवास करावा लागतो. काही नागरिकांना दुचाकीने प्रवास करावा लागतो, त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. तुमसर ते तिरोडी सुमारे ४५ किलोमीटरचे अंतर आहे. मध्य प्रदेशातील नागरिक तुमसर शहरात भाजीपाला घेऊन येत होते, त्यांनाही गाडी सोयीची ठरली होती. प्रवासी गाडी बंदमुळे व्यावसायिकांनी पाठ फिरवली आहे. मध्य प्रदेशाच्या नागरिकांचा संबंध तुमसर, भंडारा व नागपूरशी येतो. परंतु त्यांचे प्रवासी गाडी बंदमुळे येणे जाणे बंद झाले आहे.

बॉक्स

इतवारी - दुर्ग पॅसेंजरमध्ये वाढली गर्दी

मुंबई हावडा मार्गावर एक्स्प्रेस व स्पेशल गाड्या सुरू आहेत. इतवारी दुर्ग ही एकमेव पॅसेंजर गाडी रेल्वे प्रशासनाने सुरू केली आहे. या गाडीत प्रवाशांची मोठी गर्दी असते. त्यामुळे कोरोना नियमांचा फज्जा उडाला आहे. मुंबई हावडा रेल्वे मार्गावर लोकल प्रवासी गाड्या सुरू करण्याची गरज आहे. एक्स्प्रेस गाड्यातही प्रवाशांची संख्या वाढली असून, या गाडीतही मोठी गर्दी दिसत आहे.

कोट

एक्स्प्रेस गाडीत आरक्षण व कन्फर्म तिकीट असल्यासच प्रवास करता येतो. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका बसत आहे. रेल्वे प्रशासनाने कोरोना नियमांचे पालन करून या मार्गावर प्रवासी लोकल गाड्या तात्काळ सुरू कराव्यात.

-प्रा.कमलाकर निखाडे, महासचिव, जिल्हा काँग्रेस कमिटी