शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

तुमसर - तिरोडी आंतरराज्य पॅसेंजर गाडी अद्याप लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 05:00 IST

कोरोनाकाळात रेल्वे प्रशासनाने लोकल, पॅसेंजर, एक्स्प्रेस प्रवासी गाड्या बंद केल्या होत्या. त्यानंतर एक्स्प्रेस गाड्या स्पेशल ट्रेन म्हणून सुरू केल्या आहेत. त्यातही आरक्षण व कन्फर्म तिकीट काढूनच प्रवाशांना प्रवास करावा लागतो. परंतु लहान रेल्वेस्थानकात एक्स्प्रेस व स्पेशल ट्रेनला थांबा नाही. त्यामुळे लहान रेल्वेस्थानकातील प्रवाशांना रेल्वेने प्रवास करता येत नाही. अनलॉक सुरू झाल्यानंतरही लोकल व पॅसेंजर गाड्या रेल्वे प्रशासनाने अद्याप लॉक केल्या आहेत.

मोहन भोयरलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर एक्स्प्रेस गाड्या सुरू झाल्या. मात्र, व्यावसायिक आणि प्रवाशांसाठी महत्त्वाची असलेली तुमसर - तिरोडी पॅसेंजर गाडी अद्याप बंदच आहे. लहान स्थानकांवरील प्रवाशांची गैरसोय होत असून, बस व इतर वाहनाने प्रवास करावा लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. मध्य प्रदेशातील नागरिकांचा तुमसरसह इतर शहरांशी असलेला संपर्क गत दीड वर्षापासून तुटला आहे.कोरोनाकाळात रेल्वे प्रशासनाने लोकल, पॅसेंजर, एक्स्प्रेस प्रवासी गाड्या बंद केल्या होत्या. त्यानंतर एक्स्प्रेस गाड्या स्पेशल ट्रेन म्हणून सुरू केल्या आहेत. त्यातही आरक्षण व कन्फर्म तिकीट काढूनच प्रवाशांना प्रवास करावा लागतो. परंतु लहान रेल्वेस्थानकात एक्स्प्रेस व स्पेशल ट्रेनला थांबा नाही. त्यामुळे लहान रेल्वेस्थानकातील प्रवाशांना रेल्वेने प्रवास करता येत नाही. अनलॉक सुरू झाल्यानंतरही लोकल व पॅसेंजर गाड्या रेल्वे प्रशासनाने अद्याप लॉक केल्या आहेत. यासंदर्भात स्थानिक रेल्वे प्रशासनाचे अधिकारी वरिष्ठांकडून आदेश प्राप्त झाले नाहीत, असे सांगत आहेत. बस वाहतूक सुरू झाली आहे. परंतु पॅसेंजर गाड्या का सुरू झाल्या नाहीत, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.तुमसर - तिरोडी आंतरराज्य प्रवासी गाडी दीड वर्षापासून बंद आहे. या मार्गावर एक्स्प्रेस व स्पेशल गाड्या धावत नाहीत. या मार्गावरील नागरिकांना बसने महागडा प्रवास करावा लागतो. काही नागरिकांना दुचाकीने प्रवास करावा लागतो, त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. तुमसर ते तिरोडी सुमारे ४५ किलोमीटरचे अंतर आहे. मध्यप्रदेशातील नागरिक तुमसर शहरात भाजीपाला घेऊन येत होते. त्यांना ही गाडी सोयीची ठरली होती. 

इतवारी - दुर्ग पॅसेंजरमध्ये वाढली गर्दी - मुंबई हावडा मार्गावर एक्स्प्रेस व स्पेशल गाड्या सुरू आहेत. इतवारी दुर्ग ही एकमेव पॅसेंजर गाडी रेल्वे प्रशासनाने सुरू केली आहे. या गाडीत प्रवाशांची मोठी गर्दी असते. त्यामुळे कोरोना नियमांचा फज्जा उडाला आहे. मुंबई हावडा रेल्वे मार्गावर लोकल प्रवासी गाड्या सुरू करण्याची गरज आहे. 

आरक्षण व कन्फर्म तिकीट असल्यासच एक्स्प्रेस गाडीतून प्रवास करता येतो. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना याचा फटका बसत आहे. रेल्वे प्रशासनाने कोरोना नियमांचे पालन करून या मार्गावर प्रवासी लोकल गाड्या तत्काळ सुरू कराव्यात.-प्रा. कमलाकर निखाडे, महासचिव, जिल्हा काँग्रेस कमिटी

 

टॅग्स :railwayरेल्वे