शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

तुमसर न.प. प्रशासनांविरुद्ध आमरण उपोषण

By admin | Updated: July 20, 2016 00:27 IST

तुमसर नगरपरिषद प्रशासनाच्या जालाला कंटाळून अनिल श्रावणकर या व्यवसायीकाने दुसऱ्यांदा नगरपरिषदेसमोर आमरण उपोषण सुरु केले.

आश्वासन हवेत विरले : वडिलोपार्जित दुकान नावावर करुन देण्याची मागणीतुमसर : तुमसर नगरपरिषद प्रशासनाच्या जालाला कंटाळून अनिल श्रावणकर या व्यवसायीकाने दुसऱ्यांदा नगरपरिषदेसमोर आमरण उपोषण सुरु केले. अनिल श्रावणकर यांचे वडील मूलचंद श्रावणकर यांनी त्यांचे नाव असलेले दुकान मुलगा अनिल यांच्या नावे कायदेशिररित्या करुन दिली. ही दुकान अनिल यांची नावे करण्यासाठी त्यांनी कागदपत्रासह नगरपरिषदेत जमा केले. अर्ज करुन २० महिने पूर्ण झाले. शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता अनिल श्रावणकरयांनी २१ जुन रोजी नगरपरिषदेसमोर आमरण उपोषण सुरु केले होते. २४ जूनला उपोषण मंडपास तत्कालीन पोलिस निरीक्षक जगदीश गायकवाड, तहसीलदार डी.टी. सोनवाने, नगरसेवक दिपक कठाणे, आरोग्य निरीक्षक जगदीश मेहर, बाजार व्यवस्थापक सुनिल लांजेवार यांनी भेट दिली. चर्चेनंतर आवश्यक शुल्क भरुन कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषणाची सांगता झाली.२५ दिवसानंतर नगरपरिषदेने कोणतीच कारवाई केली नाही. म्हणून पुन्हा अनिल श्रावणकर यांनी मंगळवारपासून पुन्हा नगरपरिषदेसमोर आमरण उपोषण सुरु केले. येथे श्रावणकर यांना नगरपरिषदेने वेळोवेळी उपोषणाची धमकी देऊन कार्यालयीन कामकाजात बाधा आणण्याचा प्रयत्न करीत आहात. या प्रकरणात वरिष्ठ कार्यालयाकडून किंवा न्यायालयाकडून दाद मागू शकता. उपोषणावर बसणे गैर आहे अशा आषयाचे पत्र दिले आहे.तुमसर येथील प्रशासनाने अनिल श्रावणकर यांना आमरण उपोषणादरम्यान कोणत्याही अनुचित घटना घडून आल्यास आपणास सर्वस्वी जबाबदार धरण्यात येईल. या नोटीसचा उपयोग आपणाविरुध्द करावयाच्या कारवाईकरिता होवू शकतो. अशी नोटीस दिली.या प्रकारामुळे उपोषणकर्ते अनिल श्रावणकर यांनी खंत प्रगट करुन कायदेशिर मार्गाने आमरण उपोषणाचा अधिकार नाही काय? असा प्रश्न उपस्थित केला आहे. या प्रकरणाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)