शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

तुमसर एमआयडीसीकडे उद्योजकांनी फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 22:06 IST

केंद्र तथा राज्य शासनाने कारखानदारीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र एमआयडीसीला परवानगी दिली. तुमसर येथे ३० वर्षापुर्वी गोंदिया महामार्गावर देव्हाडी शिवारात एमआयडीसीची स्थापना करण्यात आली. अडीच एकरात असलेल्या या एमआयडीसीत मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध आहे. मात्र या एमआयडीसीकडे उद्योजकांनी पाठ फिरविल्याचे दिसत आहे. अनेक भुखंड रिक्त असून काही कारखाने बंद पडले आहेत.

ठळक मुद्देभूखंड रिक्त : सर्व सुविधा उपलब्ध, मात्र बंद पडले कारखाने; लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावाच नाही

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : केंद्र तथा राज्य शासनाने कारखानदारीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र एमआयडीसीला परवानगी दिली. तुमसर येथे ३० वर्षापुर्वी गोंदिया महामार्गावर देव्हाडी शिवारात एमआयडीसीची स्थापना करण्यात आली. अडीच एकरात असलेल्या या एमआयडीसीत मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध आहे. मात्र या एमआयडीसीकडे उद्योजकांनी पाठ फिरविल्याचे दिसत आहे. अनेक भुखंड रिक्त असून काही कारखाने बंद पडले आहेत.देव्हाडी येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने अडीच एकर जागेत एमआयडीसी उभारण्यात आली. लहान-मोठ्या कारखानदारांनी भुखंड आरक्षीत करून घेतले. काही कारखाने येथे सुरू झाले तर काही बंद पडले. सध्या येथे चार ते पाच कारखाने सुरू आहेत. रिक्त भुखंडांची संख्याही मोठी आहे. गत काही वर्षापासून बंद पडलेले कारखाने भंगारावस्थेत आहे. येथे वीज, पाणी, रस्ते आणि सर्व सुविधा उपलब्ध आहेत.भुखंड प्राप्त झाल्यानंतर किमान तीन वर्षात कारखाना सुरू करण्याचा नियम आहे. परंतु येथे वर्षानुवर्ष भुखंड रिक्त आहे. एमआयडीसीत लहान उद्योजकांना प्रथम प्राधान्य देण्यात येते. येथे लहान कारखाने अखेरच्या घटका मोजून बंद पडल्या आहेत. एमआयडीसीचे मुख्य कार्यालय भंडारा येथे आहे. दरवर्षी शासनाला कारखान्यांची स्थिती शासनाला कळवावी लागते. किती कारखाने बंद आहे किती सुरू आहे याची माहिती सादर करण्यात येत आहे. परंतु अद्याप येथे दखल घेण्यात आली नाही. केवळ कागदोपत्री माहिती संकलीत करून शासनाला कळविली जाते.तरूण उद्योजकाला येथे भुखंड मिळत नाही. भुखंड नाही अशी माहिती संबंधित विभाग देत आहे. भुखंड आरक्षीत आहे परंतु कारखान्याचा येथे पत्ता नाही. पुन्हा किती दिवस सदर भुखंड त्या कारखानदाराजवळ राहणार हा मुख्य प्रश्न आहे. एमआयडीसी मध्ये उद्योजकाना आकर्षीत करण्यासाठी लोकप्रतिनिधीही पुढाकार घेत नसल्याचे दिसून येत आहे.शेतकऱ्यांकडून कवडीमोल किंमतीत घेतल्या जमिनीदेव्हाडी येथे आठ ते दहा शेतकऱ्यांकडून सुमारे अडीच हेक्टर शेतजमीन घेण्यात आली. त्यावेळी कवळीमोल किंमत देण्यात आली. एमआयडीसीसाठी मोठा गाजावाजा करण्यात आला. परंतु प्रत्यक्षात अद्यापपर्यंत कारखान्याची संख्या वाढली नाही. औद्योगिक धोरणावर ठपका ठेवण्यात येतो. मुख्य रस्त्यावरील जमीनी लाख मोलाच्या असताना कवळीमोल भावात घेण्यात आल्या होत्या.एमआयडीसीत जीवन प्राधिकरणची इमारतदेव्हाडी एमआयडीसीची जागा मौल्यवान आहे. अनेक वर्ष ती पडित होती. यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाचे जलशुद्धीकरण केंद्र व इमारत येथे तयार करण्यात आली आहे. तिही बंद राहते. प्राधीकरणाचे साहित्य येथे पडून आहेत.रिक्त भूखंडाची माहिती मागितलीदेव्हाडी एमआयडीसी येथे बंद पडलेले कारखाने व रिक्त भुखंडांची माहिती राज्य शासनाने मागितल्याची माहिती आहे. भंडारा व गोंदिया येथे एमआयडीसीचे कार्यालय आहे, कारखाने बंद पडल्याची कारणे, कारखाना किती वर्ष सुरू होता, याचा अहवाल मागविला आहे.एमआयडीसी सुरू करताना येथे उद्योग येतील अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात कारखानदार आलेच नाही. त्यामागील कारणांचा शोध घेण्याची गरज आहे. कारखाने बंद पडल्याने बेरोजगारी वाढत आहे.-डॉ. पंकज कारेमोरे,युवा नेते तुमसर.