शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

तुमसर-बपेरा मार्ग ठरतोय जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 23:17 IST

तुमसर-बपेरा राज्यमार्गची गत काही दिवसापासून दुरवस्था झाली आहे. सिंदपुरी गावाचे शेजारी असणाऱ्या या मार्गावर जीवघेणे खड्डे तयार झाल्याने खड्डे चुकवत प्रवास करताना वाहनधारकांना अपघाताचा धोका पत्करावा लागत आहे. या राज्यमार्गाची तात्पुरती डागडुजी करण्यात येत असली तरी मार्ग पुर्णत: दुरुस्ती करण्यात येत नाही. बिनाखी ते दवेसर्रा गावापर्यंत राज्यमार्गाहून पायी चालणे मुश्किल झाले आहे.

ठळक मुद्देअपघातात वाढ : परिसरातील वाहनधारक संतप्त, आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : तुमसर- बपेरा राज्यमार्गासह सिहोरा परिसरात असलेल्या रस्त्यांवर जीवघेणे खड्डे पडल्याने अपघातात वाढ झाली आहे. रात्री यामार्गाने प्रवास करताना वाहन धारकांना चांगलीच कसरत करावी लागते. रस्त्याची त्वरीत दुरुस्ती न झाल्यास परिसरातील नागरिकांनी आंंदोलनाचा इशारा दिला आहे.तुमसर-बपेरा राज्यमार्गची गत काही दिवसापासून दुरवस्था झाली आहे. सिंदपुरी गावाचे शेजारी असणाऱ्या या मार्गावर जीवघेणे खड्डे तयार झाल्याने खड्डे चुकवत प्रवास करताना वाहनधारकांना अपघाताचा धोका पत्करावा लागत आहे. या राज्यमार्गाची तात्पुरती डागडुजी करण्यात येत असली तरी मार्ग पुर्णत: दुरुस्ती करण्यात येत नाही. बिनाखी ते दवेसर्रा गावापर्यंत राज्यमार्गाहून पायी चालणे मुश्किल झाले आहे. तीन वितरण कंपनी कार्यालयासमोर राज्य मार्ग दोन भागात विभागला आहे. यामुळे भरधाव वाहनाचे अपघात वाढले आहेत. रात्री होणाऱ्या अपघाताची तर मालिकाच सुरु झाली आहे. या राज्यमार्गावर वळण झुडपाचे मोठे आच्छादन पसरले आहे. वळन मार्ग स्वच्छ करण्यात न आल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.सिहोरा ते गोबरवाही मार्गाची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. या मार्गावर अनेक गावाचे वास्तव्य असून वर्दळ जास्त राहते. परंतु मार्गाची दुरुस्ती करण्यात आली नाही. सिहोरा ते टेमनी गावांना जोडणाºया रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या मार्गाने चांदपुरात भाविक दर्शनाकरिता ये-जा करीत आहेत. मुरली ते चांदपुर, सोंड्या ते टेमनी, मोहाडी, खापा, बिनाखी ते गोंडीटोला, बिनाखी ते ब्राम्हणटोला या गावातील नागरिकांना प्रवास करणे मोठे कसरतीचे काम झाले आहे. महालगाव फाटा ते नाकाडोंगरी गावाला जोडणाºया १८ किमी अंतराचे केलेले डांबरीकरण महिनाभरात उखडले आहे.रस्ते दुरुस्तीसाठी आंदोलन करण्याचा ईशारा सामाजिक कार्यकर्ते किशोर रहांगडाले, मुरलीचे सरपंच राजेश बारमाटे, वाहनीचे सरपंच गळीराम बांडेबुचे, देवानंद लंजे, अंबादास कानतोडे, सुनील मेश्राम यांनी दिला आहे.