शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

मग्रारोहयोच्या कामात तुमसर तालुका अव्वल

By admin | Updated: June 15, 2014 23:23 IST

मग्रारोहयोच्या अकुशल तसेच कुशल कामावर जिल्ह्यात सर्वाधिक ५ कोटी ६२ लाख रुपयांचा खर्च करुन मजुरांच्या हाताला कामे देणारी तुमसर पंचायत समिती जिल्ह्यात अव्वल ठरली आहे. या आर्थिक वर्षात तुमसर

तुमसर : मग्रारोहयोच्या अकुशल तसेच कुशल कामावर जिल्ह्यात सर्वाधिक ५ कोटी ६२ लाख रुपयांचा खर्च करुन मजुरांच्या हाताला कामे देणारी तुमसर पंचायत समिती जिल्ह्यात अव्वल ठरली आहे. या आर्थिक वर्षात तुमसर पंचायत समितीने २० कोटी रुपयांची कामे करण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पंचायत समिती तुमसरमार्फत ५० टक्के स्तरावर ग्रामपातळीवर मोठ्या प्रमाणात २१५ कामे सुरू आहेत. १२ हजार ८४२ मजूर या कामावर काम करीत आहेत. यात पांदण रस्त्याच्या ३९ कामांवर ७ हजार ५३२ मजूर, नाला सरळीकरणाऱ्या १५ कामांवर २ हजार १८६ मजूर, तलावातील गाळ काढण्याच्या वैयक्तिक लाभाच्या योजनेतील शौचालय, सिंचन विहीर बांधकामावर ३७२ मजूर सध्या कार्यरत आहेत. आतापर्यंत अकुशल कामावर काम करणाऱ्या मजुरांना ४ कोटी ४७ लाख ५४ हजार रुपये तर कुशल कामाकरीता साहित्यावर १ कोटी १५ लाख ६ हजार असे एकूण ५ कोटी ६२ लाख ६१ हजार रुपये खर्च करण्यात आले.तालुक्यात ३५ हजार ५३४ जॉबकार्डधारक असून आतापर्यंत २ लाख ९७ हजार १९८ मनुष्य दिवस मजुरांना काम पुरविण्यात आले. यापैकी १ लाख ८७ हजार २९७ मनुष्य दिवस महिला मजुरांच्या हाताला कामे देण्यात आल्याची माहिती पं.स. सभापती कलाम शेख व खंडविकास अधिकारी स्नेहा कुलथे यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)