शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरात शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:33 IST

महिनाभरात प्रशासकीय मान्यता मिळवून भंडारा येथील नागरिकांना शुध्द पाणी देण्याचा प्रयत्न करणार आहे, ....

पाणी प्रश्नावर चर्चा : नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासनलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महिनाभरात प्रशासकीय मान्यता मिळवून भंडारा येथील नागरिकांना शुध्द पाणी देण्याचा प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन नगराध्यक्ष सुनिल मेंढे व मुख्याधिकारी अनिल अढागडे यांनी माजी नगरसेवक व भाकपचे जिल्हा सचिव हिवराज उके यांनी मुख्याधिकारी यांच्या दालनात शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेप्रसंगी दिले.दूषित पिण्याच्या पाण्याची व पाणी टंचाईची समस्या सोडवून कायमस्वरुपी उपाययोजना करा तसेच नागनदी आणि इकॉर्निया पासून वैनगंगा नदीचे संरक्षण करा, अन्यथा दि.१९ जुलै पासून नगरपरिषदेसमोर भाकपचे नगरसेवक कॉ.हिवराज उके यांच्या नेतृत्वात जनआंदोलन करण्यात येईल असे जाहीर केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार दि.१७ जुलैला हिवराज उके यांना बोलावून चर्चा करण्यात आली. त्या प्रसंगी त्यांना आश्वासन देऊन आंदोलन परत घेण्याचे आवाहन केले. त्यामुळे दि. १९ जुलै चे आंदोलन तात्पुरते स्थगीत करण्यात आले. भाकपच्या शिष्टमंडळासोबत सुमारे तासभर विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. त्यात पिण्याच्या पाण्यासाठी १०५ कोटी रुपयांची पाणी पुरवठ्याची नवीन योजना तयार करण्यात आली. त्यात १०० टक्के अनुदान आहे. नगर परीषदेचा १ टक्के १४ व्या वित्त आयोगाच्या निधीमधून भरला जाईल. तसेच येत्या महिनाभरात तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यता प्राप्त करण्यात येईल. तसेच शहरातील काही भागात विशेषत: "स्लम" एरियात ४-५ ठिकाणी असे "प्लांट" लावून शुद्ध पाणी देण्यात येईल असे सांगण्यात आले. दूषित किंवा गढूळ पाणी येत असल्यास पाणी पुरवठा विभागात ८०८७१०७३२३ या क्रमांकावर तक्रार नोंदवावी जेणेकरून त्यावर कारवाई करून शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येईल, असे तक्रारीसाठी टोल फ्री नंबरची मागणी केल्यानंतर सांगण्यात आले.दिलेल्या आश्वासनानुसार भंडारा शहरातील नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, नागनदीच्या गटारगंगेपासून व इकॉर्नियापासून संरक्षण करण्यासाठी कारवाई न केल्यास भाकपच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे हिवराज उके यांनी सांगितले. चर्चेत नगराध्यक्ष सुनिल मेंढे, मुख्याधिकारी अनिल अढागळे, हिरालाल भेदे, प्रदीप पटेल तसेच शिष्टमंडळात हिवराज उके, सदानंद इलमे, मोहनलाल शिंगाडे, झुलनबाई नंदागवळी, हरिदास जांगडे तसेच प्रभाकर ठवरे व एस.एस. बोरकर यांचा समावेश होता.