शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

रिपाइं ऐक्यापूर्वी आघाडीसाठी प्रयत्न करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 22:59 IST

रिपब्लिकन पाटीर्तील पूवीर्चे नेते आता वेगवेगळ्या गटात विखुरलेले आहेत. त्यामुळे सर्वांना एकत्र आणण्यासाठी बराच वेळ लागू शकतो.

ठळक मुद्देडॉ.राजेंद्र गवई : रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता मेळावा

आॅनलाईन लोकमतभंडारा : रिपब्लिकन पाटीर्तील पूवीर्चे नेते आता वेगवेगळ्या गटात विखुरलेले आहेत. त्यामुळे सर्वांना एकत्र आणण्यासाठी बराच वेळ लागू शकतो. त्यापूर्वी आंबेडकरवादी नेत्यांची आघाडी व्हावी याकरिता आपण प्रयत्न करणार आहे. यापुढे येणाºया सर्वच निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे रिपाइंचे जनरल सेक्रेटरी डॉ.राजेंद्र गवई यांनी पत्रपरिषदे सांगितले.भंडारा येथे रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी आले असता ते ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी डॉ.गवई म्हणाले, प्रमुख राजकीय पक्ष हे सर्वच निवडणुकीत आंबेडकरी जनतेची मते मिळवण्यासाठी गटगटातील नेत्यांसोबत बोलणी करतात आणि कमी जागा देतात. त्यामुळे रिपाइंचे आतापर्यंत नुकसान होत आले आहे. आज आपसातील मतभेदामुळे दबावगट तयार करता येत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. यापुढे जिल्हा परिषद, पंचायत समितीस्तरावर पात्र उमेदवारांचा शोध घेणे सुरू केले आहे. यापुढे रिपाइंचे उमेदवार पक्षाच्या चिन्हावरच लढतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. आता बाबासाहेबांच्या रिपार्इंची ताकद वाढविणे हेच आमचे ध्येय असल्याचेही त्यांनी सांगितले.कोरेगावभीमा प्रकरणात ३८ जणांना अटक झाली असून हजारो निरपराध तरूणांवर गुन्हे दाखल केलेले आहे. त्यांना अद्याप जामिनही मिळालेला नाही. त्यामुळे या युवकांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली आहे. या युवकांसाठी आम्ही कोणासोबतही चर्चा करण्यासाठी तयार आहोत. त्यामुळे आंबेडकरवादी नेत्यांनी आपसात बोलून दबावगट तयार करण्यासाठी सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.स्वतंत्र विदर्भ, विविध प्रवर्गाचे आरक्षण आदी अनेक विषयांवर आमचा पक्ष काम करणार आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष सुबोध वाघमोडे, नागपूरचे अध्यक्ष प्रकाश कुंभे, प्रदेश उपाध्यक्ष गोकूल पांडे, केंद्रीय कार्यकारीणी सदस्य वसंतराव हुमणे, जिल्हाध्यक्ष मदन बागडे उपस्थित होते.