शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन क्षेत्र विकासासाठी प्रयत्न करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 23:57 IST

पवनी ऐतिहासिक वास्तू व मोठ्या संख्येने मंदिर असलेले शहर आहे. कित्येक मंदिर परिसरात मोकळी जागा उपलब्ध आहे. चंडिका मंदिर परिसरात टेकडी आहे, अशीच नगराचे तिन्ही बाजूला आहे.

ठळक मुद्दे रंगमंच लोकार्पण सोहळा : रामचंद्र अवसरे यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : पवनी ऐतिहासिक वास्तू व मोठ्या संख्येने मंदिर असलेले शहर आहे. कित्येक मंदिर परिसरात मोकळी जागा उपलब्ध आहे. चंडिका मंदिर परिसरात टेकडी आहे, अशीच नगराचे तिन्ही बाजूला आहे. मंदिराच्या परिसरात लोकोपयोगी इमारती व टेकडीचे सौंदर्यीकरण केल्यास पर्यटक वाढतील, असा आशावाद बाळगून पर्यटन क्षेत्र विकासासाठी प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांनी केले.चंडिका माता मंदिर परिसरातील दसरा मैदानात आमदार स्थानिक विकास निधीतून बांधकाम झालेल्या रंगमंचाचे लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. भंडारा विधानसभा मतदारसंघातील पवनी व भंडारा ही दोन्ही मोठी शहरे विकासाच्या उच्च पातळीवर घेवून जाण्यासाठी मी प्रयत्न करित असल्याचे आ. रामचंद्र अवसरे यांनी सांगितले.याप्रसंगी नगर परिषद अध्यक्षा पुनम काटेखाये कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा बुराडे उपस्थित होत्या. यावेळी श्री चंडिका माता देवस्थान पंचकमेटी पब्लिक ट्रस्ट चे अध्यक्ष राजूभाई ठक्कर, उपाध्यक्ष मोडकूजी लोखंडे, सचिव देवाजी बावनकर, सदस्य बंडू बावनकर, लीलाधर मुंडले, नरेश बावनकर, विनायक मुंडले, बाळकृष्ण कलंत्री, धनराज लांबट, खेमराज बावनकर व अन्य मान्यवर सहकारी उपस्थित होते.प्रास्ताविक ट्रस्टचे अध्यक्ष राजूभाई ठक्कर, संचालन सदस्य विनायक मुंडले व आभार प्रदर्शन अशोक पारधी यांनी केले. त्यानंतर गोपाल काला कीर्तणाला सुरूवात करण्यात आली. भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.