शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

व्हॅनसह चालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

By admin | Updated: September 27, 2015 00:30 IST

एखाद्या हिंदी चित्रपटाची कहाणी शोभेल अशी घटना तुमसरात घडली आहे.

खैरलांजी येथील घटना : मारेकऱ्याविरुद्ध पोलिसात गुन्हे दाखलतुमसर : एखाद्या हिंदी चित्रपटाची कहाणी शोभेल अशी घटना तुमसरात घडली आहे. रात्रीच्या सुमारास परतीच्या मार्गावर असताना रस्त्यावर मारुती व्हॅन उभी असल्याचे पाहून अज्ञात चार इसम मुखवटे बांधून दुचाकीने येताच वाहन चालकावर लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला वाहनात बसवून सीट बेल्टने बांधून वाहनाला पेटवून वाहन रस्त्याच्या कडेला खाईत ढकलून दिले. त्यानंतर मारेकरी पसार झाले. दरम्यान, काही वेळातच चालकाला शुद्ध आल्याने तो गाडीबाहेर निघाला. ही घटना तुमसर तालुक्यातील खैरलांजी येथील काळा गोटा पुलाजवळ शुक्रवारच्या रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. फरहान सलीम कुरैशी (२३) रा.हरदोली (सिहोरा) असे या जखमी वाहन चालकाचे नाव आहे. रोजगारासाठी फरहानला वडिलांनी मारुती व्हॅन एम.एच. ३६ - ४५३९ घेऊन दिली. काही दिवसांपासून वाहनात बिघाड आल्याने दुरुस्तीसाठी फरहान वाहन घेऊन शुक्रवारी सायंकाळी हरदोली येथून तुमसरकडे निघाला. शुक्रवारला दुकाने बंद असल्यामुळे तो तुमसरहून हरदोलीकडे परत जाताना डोंगरला येथे गणेशोत्सव मंडळात नृत्य कार्यक्रम सुरु असल्याने त्याने वाहन रस्त्याच्या कडेला लावून कार्यक्रम पाहत राहिला. रात्री १० वाजता जाताना काळा गोटा पुलानजीक वाहन पंक्चर झाल्याने वाहन रस्त्याच्या कडेला लावून टायर बदलविले. तितक्यात तीन दुचाकीने तोंडावर मुसके बांधलेले चार इसमांनी लोखंडी रॉडने बेशुद्ध होईस्तोवर त्याला मारले. बेशुद्ध अवस्थेतच मारूती व्हॅनसह रस्त्याच्या लगतच्या खाईत ढकलले. त्यानंतर वाहनाला आग लावली. दरम्यान, काही वेळातच फरहानला शुद्ध आल्यानंतर गाडीबाहेर निघाला. हरदोली येथील प्रकाश पारधी या मित्राला भ्रमणध्वनीवरुन हकीकत सांगितला. काही वेळातच फरहानचे वडील व पारधी घटनास्थळी येऊन घटनेची माहिती तुमसर पोलिसांना दिली. पोलीस येईपर्यंत वाहन जळून खाक झाले होते. याप्रकरणी तुमसर पोलिसांनी भादंवि ३०७, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला असून तपास एपीआय ए.एम. जाधव करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)