देव्हाडीतील घटना : २० दिवसात तिसरी घटना, दोन तास वाहतूक ठप्पतुमसर : रेती वाहून नेणाऱ्या एका मालवाहू ट्रकने तुमसर रोड येथे मुंबई-हावडा मुख्य रेल्वे मार्गावरील बंद फाटकाला धडक दिली. यात लोखंडी फाटक मध्यभागातून वाकला. ही घटना शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. मागील २० दिवसात तीनवेळा वाहनांनी फाटकाला धडक दिल्याने नुकसान झाले आहे. तुमसर रोड येथे मुंबई-हावडा रेल्वे मार्गावरील एलसी क्र. ५३२ ला रेती वाहून नेणाऱ्या मालवाहू ट्रक क्रमांक एम एच ४० एन ५४८६ ने फाटकाला जोरदार धडक दिली. यात फाटक मध्यातून वाकली. त्यामुळे तुमसर-गोंदिया राज्य महामार्गावरील वाहतूक दोन तास बंद होती. महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सुदैवाने रेल्वेगाडीला येण्यास उशिर होता. अन्यथा येथे भीषण अपघात घडण्याची शक्यता होती. रेल्वे प्रशासनाने मालवाहू ट्रक विरोधात गुन्हा दाखल केला. मागील २० दिवसात येथे तीनवेळा रेल्वे फाटकाला विविध वाहनांनी धडक मारली. तुमसर रोड येथे दक्षीण पूर्व रेल्वेचे जंक्शन आहे. प्रत्येक विभागाचे वरिष्ठ अधिकारी व त्यांचा ताफा मुख्यालयी राहतो, पंरतु धडकेच्या बचावापासून रेल्वे प्रशासनाने उपाययोजना केली नाही. येथे उड्डाणपुलाचे बांधकाम बंद आहे. मागील २० वर्षापासून येथे उड्डाणपूल प्रस्तावित आहे. धडक देणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध कारवाईची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)
रेल्वे फाटकाला ट्रकची धडक
By admin | Updated: August 8, 2015 00:40 IST