शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भरधाव ट्रकने म्हशीचा कळप चिरडला, चार ठार, सहा गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 06:00 IST

आंतरराज्यीय महामार्गावरून मध्यप्रेदशातून भरधाव ट्रक (क्रमांक एमएच ४० एके ३८) येत होता. नाकाडोंगरी ते राजापूर दरम्यान शिवमंदिराजवळील वळणावर म्हशीच्या कळपात हा ट्रक शिरला. म्हशींना चिरडत ट्रक पुढे गेला. त्यात चार म्हशी जागीच ठार झाल्या. रस्त्यावर रक्तामासाचा सडा पडला होता. या घटनेची माहिती होताच गावकरी घटनास्थळी धावून गेले.

ठळक मुद्देनाकाडोंगरची घटना : घटनास्थळी ट्रक सोडून चालक पसार

लोकमत न्यूज नेटवर्कनाकाडोंगरी : भरधाव ट्रकने रस्त्याने जाणारा म्हशीचा कळप चिरडल्याची घटना तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी ते राजापूर वळणावर शुक्रवारी दुपारी घडली. या धडकेत चार म्हशी जागीच ठार तर सहा म्हशी गंभीर जखमी झाल्या. रस्त्यावर रक्तामासाचा सडा पडला होता. या घटनेनंतर चालक ट्रक घटनास्थळावर सोडून पसार झाला.आंतरराज्यीय महामार्गावरून मध्यप्रेदशातून भरधाव ट्रक (क्रमांक एमएच ४० एके ३८) येत होता. नाकाडोंगरी ते राजापूर दरम्यान शिवमंदिराजवळील वळणावर म्हशीच्या कळपात हा ट्रक शिरला. म्हशींना चिरडत ट्रक पुढे गेला. त्यात चार म्हशी जागीच ठार झाल्या. रस्त्यावर रक्तामासाचा सडा पडला होता. या घटनेची माहिती होताच गावकरी घटनास्थळी धावून गेले. हा प्रकार पाहून ट्रकचालक घटनास्थळीच ट्रक सोडून पसार झाला.या अपघातात शेतकरी गिरीधारी वाघमारे, कंठीराम वाघमारे, कचरू गहाणे, पांडूरंग गौपाले, गजानन वाघमारे, यदुनाथ परबते, ब्रीजलाल परबते, विवेकानंद परबते यांचे मोठे नुकसान झाले.या घटनेची माहिती गोबरवाही पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. ट्रकचालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संतप्त गावकऱ्यांचा रस्ता रोकोअपघातात म्हशी ठार झाल्याने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी आंतरराज्यीय महामार्गावर दुपारी ३ वाजतापासून चक्का जांब आंदोलन सुरू केले. यामुळे दोनही बाजूला वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. जोपर्यंत नुकसान भरपाई मिळणार नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमीका घेतली होती. वृत्त लिहिस्तोवर गावकरी महामार्गावर ठिय्या देवून बसले होते. पोलिसांनी नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न चालविला आहे.

टॅग्स :Chakka jamचक्काजाम