शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीवर ट्रिपल सीट, तर लायसन्स निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2021 23:43 IST

केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयातर्फे अडीच वर्षापूर्वीच मोटारवाहन कायद्यात सुधारणा करण्यात आली होती. मात्र याची अंमलबजावणी झालेली नव्हती. आता राज्यात याची अंमलबजावणी होणार असून पोलिसांनीही कंबर कसली आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मोटारवाहन सुधारणा अधिनियम २०१९ ची अंमलबजावणी जिल्ह्यात चार दिवसांपूर्वी लागू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत ट्रिपल सीट गाडी चालविताना आढळल्यास एक हजार रुपये दंड व तीन महिन्यांसाठी परवाना निलंबनाची कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे सावधान, वाहतूक नियमांचे पालन गरजेचे असेच म्हणण्याची वेळ आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयातर्फे अडीच वर्षापूर्वीच मोटारवाहन कायद्यात सुधारणा करण्यात आली होती. मात्र याची अंमलबजावणी झालेली नव्हती. आता राज्यात याची अंमलबजावणी होणार असून पोलिसांनीही कंबर कसली आहे.

तर खटला दाखल होणार- नवीन अंमलबजावणी ओव्हरटेक करताना अडथळा निर्माण करणे, धोकादायकरित्या वाहन चालविणे, मद्यप्राशन करुन वाहन चालविणे, नो पार्किंग करणे, फुटपाथवर वाहन उभे करणे आदी प्रकरणात थेट न्यायालयातच खटला दाखल करण्यात येणार आहे.

दंड वाढला तरी मानसिकता जैसे थे - मोटारवाहन कायद्यांतर्गत विविध कलमांखाली दंडाची रक्कम वाढविण्यात आली असली तरी जे होईल ते पाहून घेऊ अशी मानसिकता काही वाहनधारकांची दिसून येत आहे. त्यामुळे जनजागृतीवर भर द्यायला हवे.

११ डिसेंबरपासून अंमलबजावणी सुरू- मोटारवाहन सुधारीत कायद्याची अंमलबजावणी जिल्ह्यात ११ डिसेंबरपासून करण्यात आली आहे. आता नियम मोडणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

सुधारणा झालेल्या कायद्याबाबत जनजागृतीही करणे अत्यंत गरजेचे आहे. दंडाची रक्कम वाढविण्यात आली असली तरी वाहनचालकांनीही सजग राहून नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळेच अपघातालाही आळा बसू शकणार आहे. -वसंत जाधव, जिल्हा पोलीस अधीक्षक भंडारा.

 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीRto officeआरटीओ ऑफीस