शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
2
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
3
एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार
4
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 
5
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था
6
भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?
7
चिंताजनक! कोणतेही प्रशिक्षण नसलेल्यांकडून भारतात २.५ टक्के महिलांची होतेय प्रसूती, महाराष्ट्रात स्थिती काय?
8
पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास 
9
रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला : मोरारीबापू
10
गणपती विसर्जन सोहळ्यावर शोककळा; वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू  
11
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
12
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
13
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
14
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
15
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
16
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
17
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
18
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
19
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
20
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...

हौताम्य पत्करणाऱ्या जवानांना श्रद्धांजली

By admin | Updated: October 22, 2016 00:26 IST

कर्तव्य पथावर अग्रेसर होत असता हौतात्म्य पत्करणाऱ्या वीर पोलीस जवानांची आठवण म्हणून संपूर्ण देशभर पोलीस प्रशासनाद्वारे..

मान्यवरांचे मार्गदर्शन : पोलीस मुख्यालयात हुतात्मा दिन भंडारा : कर्तव्य पथावर अग्रेसर होत असता हौतात्म्य पत्करणाऱ्या वीर पोलीस जवानांची आठवण म्हणून संपूर्ण देशभर पोलीस प्रशासनाद्वारे २१ आॅक्टोबर हा हुतात्मा स्मृतीदिन म्हणून पाळला जातो. त्यानिमित्ताने आज पोलीस मुख्यालय भंडारा येथील पोलीस हुतात्मा स्मारक स्मृतिस्तंभ येथे सकाळी ८ वाजता श्रद्धांजली व शोक सलामीचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात अतिथी म्हणून अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश आर.पी. पांडे उपस्थित होते.यावेळी पोलीस अधीक्षक विनीता साहू यांनी आजचा दिवस पोलीस प्रशासनासाठी अत्याधिक महत्वाचा दिवस आहे. यावर्षी देखील संपूर्ण भारतातून एकूण ४७३ पोलीस अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य बजावतील असताना आपल्या मातृभूमिच्या संरक्षणार्थ प्राणाची आहुती दिलेली आहे. त्यांना शतश: वंदन असे बोलून शहीद पोलिसांच्या स्मृतिंना उजाळा दिला. २१ आॅक्टोबर १९५९ रोजी लडाख हद्दीत भारत तिबेट सीमेवर १६ हजार फुट उंचावर कडाक्याच्या थंडीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे १० शिपाई गस्त घालत असताना हिंदी-चिनी भाई भाई असा नारा लावणाऱ्या चिनी सेनिकांनी त्यांच्यावर अकस्मात हल्ला केला. याची चाहूल लागताच सीमेच्या रक्षणार्थ अपुरे मनुष्यबळ व अपुरे शस्त्रे असल्याची पर्वा न करता जवानांनी मातृभूमिसाठी प्राणपणाने लढून हौताम्य पत्करले. याच्यावर पोलीस इतमात अंत्यसंस्कार करण्यात आले. ही घटना घडली त्या हॉट्रस्प्रिंग येथे या वीरांचे स्मारक उभारले आहे. तेव्हापासून हा दिवस पोलीस हुतात्मादिन म्हणून पाळला जातो. तेथे संपूर्ण भारतातील पोलिसांनी या विराचे स्मारक उभारले आहेत.सदर प्रसंगी आर.पी. पांडे, जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, पोलीस अधीक्षक विनीता साहू, अपर पोलीस अधीक्षक रश्मि नांदेडकर यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली व अग्नीशस्त्राद्वारे १२५ काडतूसांच्या फैरी झाडून शोक सलामी देण्यात आली.सदर प्रसंगी कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या शहीदाचे नावे पोलीस उपविभागीय अधिकारी जोगदंड साळी यांनी वाचन केले तसेच भंडारा जिल्ह्यातील शहीद पोलीस अधिकारी, कर्मचारी, दिपक सखराम रहिले, योगेश्वर तुकाराम हेडाऊ, शिवलाल सिताराम बरैया, दामोधर वडतकर, रविकुमार जौंजाळ, ईशांत रामरतन भुरे, भोजराम बाभरे, मुलचंद भोयर, मनोज गिऱ्हेपुंजे, बी.डी. बांते, सीआरपीएफ यांच्या स्मृतींना ही उजाळा देण्यात आला. पोलीस अधीक्षक विनीता साहू यांनी शहीद दामोधर शंकर वडतकर यांनी ज्या शाळेत शिक्षण घेतले त्या जि.प. पूर्व माध्यमिक शाळा मांडवी येथे जावून कार्यक्रमाला उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)