शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

आदिवासींचा एल्गार; वनविभागाचे काम पाडले बंद

By admin | Updated: March 26, 2017 00:23 IST

सुसुरडोह पुनर्वसनग्रस्त गर्रा बघेडा, आसलपानी येथील सुमारे ५०० आदिवासी पुरुष महिलांनी वन विभागाने सुरु केलेल्या ....

सुसूरडोह पुनर्वसनग्रस्तांची व्यथा : शेती व शेतीपूरक गटावर वन विभागाचा डोळातुमसर : सुसुरडोह पुनर्वसनग्रस्त गर्रा बघेडा, आसलपानी येथील सुमारे ५०० आदिवासी पुरुष महिलांनी वन विभागाने सुरु केलेल्या शासकीय जागेतील कामांना विरोध दर्शवून काम बंद केले. उदरनिर्वाहाचे साधन शासनाने उलपब्ध करून दिले नाही व आता गावाशेजारील शेती व शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी खुला ठेवण्याची मागणी आदिवासी समुदायाने केली आहे.बावनथडी प्रकल्पात सुसुरडोह गाव बाधीत झाले. सुसुरडोह गावाचे पुनर्वसन गर्रा - बघेडा येथे करण्यात आले. पुनर्वसन जरी झाले तरी उदरनिर्वाहाचे साधन शासनाने उपलब्ध करून दिले नाही. गट क्रमांक २४२ हा सुसुरडोह पुनर्वसन स्थळाजवळ रिकामा आहे. वनपरिक्षेत्र नाकाडोंगरी येथील कर्मचाऱ्यांनी या गटावर स्वच्छता करणे सुरु केले होते. या कामाला गर्रा बघेडा, आसलपानी पुनर्वसन स्थळातील सुमारे ५०० आदिवासी समुदायाने विरोध करून काम बंद पाडले. शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. नंतर वनविभागाने काम बंद केले. गट क्रमांक २४२ हा गट शासनाने खुला ठेवावा. या गटात आदिवासी समुदाय शेती व शेतीपुरक व्यवसाय करू शकतील. शासनाने तसे आश्वासन यापूर्वी येथे दिले होते. अशी मागणी जि.प. सदस्य अशोक उईके, अन्याय अत्याचार समिती सदस्य लक्ष्मीकांत सलामे, विकास मरसकोल्हे, दिनेश मरस्कोल्हे यांनी केली आहे. प्रशासनानी दखल न घेतल्यास आदिवासींचे जनआंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.आधी पुनर्वसन नंतर धरण या नियमाला येथे केराची टोपली दाखविण्यात आली आहे. आजही पुनर्वसन स्थळी मुलभूत सोयी सुविधांची मोठी कमतरता आहे. कमकासुर, सुसुरडोह, सितेकसा या गावातील बाधीत हे आदिवाीस बांधव आहेत. शेती, घर गेले. पुनर्वसनस्थळी केवळ घरे देण्यात आली. रोजगाराची सोय येथे केली नाही. रिकाम्या भूखंडावर येथे आता शासनाची वक्रदृष्टी गेली आहे. नियमानुसार शासनाने शेती व शेतीपूरक व्यवसायाकरिता ही रिकामी जागा देण्याचे आश्वासन यापूर्वीच दिले होते. येथे लढा उभारण्यात येईल असा इशारा आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले आहे. (तालुका प्रतिनिधी)