शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षांचे संवर्धन गरजेचे

By admin | Updated: February 3, 2015 22:51 IST

निसर्गाचे संतुलन राखल्यास वातावरणातील प्रदूषण वाढणार नाही. त्यामुळे मनुष्य आरोग्यास धोका निर्माण होणार नाही. त्यासाठी वृक्षांच्या संवर्धनाची गरज आहे, असे प्रतिपादन प्रा. सुमंत देशपांडे यांनी केले.

भंडारा : निसर्गाचे संतुलन राखल्यास वातावरणातील प्रदूषण वाढणार नाही. त्यामुळे मनुष्य आरोग्यास धोका निर्माण होणार नाही. त्यासाठी वृक्षांच्या संवर्धनाची गरज आहे, असे प्रतिपादन प्रा. सुमंत देशपांडे यांनी केले. निसर्ग, झाडे व फुलाप्रती आस्था व प्रेमभावना जागृत व्हावी म्हणून ग्रीनहेरीटेज पर्यावरण संस्थेच्या वतीने स्थानिक शितला माता मंदिर सभागृहात पुष्पगुच्छ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते विचार व्यक्त करीत होते. उद्घाटक म्हणून केशवराव निर्वाण तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते राधाकिसान झंवर, ईश्वरलाल काबरा, अ‍ॅड. राकेश सक्सेना, नुतन मोघे, ग्रीनहेरीटेजचे संस्थापक मो. सईद शेख, सनफ्लॅगचे उपमहाव्यवस्थापक के.जी. बांते उपस्थित होते. पाहुण्यांचे वृक्षरोपटे देवून स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक सईद शेख यांनी केले. निर्वाण यांनी उद्घाटन भाषणात भंडारावासीयांसाठी हे उपक्रम एक सुंदर पर्वणी अशा शब्दांत उपक्रमाची स्तूती करून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. झँवर यांनी, दुखी जीवन सुखी करण्याकरिता ईश्वराने जसे आपल्याला जीवन जगण्याकरिता वायू, ऊन आणि जल प्रदान केले आहे. तसेच आपण ही निसर्गाकडे जावून आपले जीवन ही सार्थकी करण्याचे आवाहन केले. स्पर्धेत विविध जातीच्या रंगबेरंगी पुष्पांनी सजविलेले आकर्षक पुष्पगुच्छ व कुंड्या प्रदर्शित करण्यात आल्या होत्या.इंदिरा काबरा, अरविंद गुप्ता, सुधाकर चकोले, डवले, संजय बोरकर उपस्थित होते. मंजुषा गायधनी यांनी संचालन तर आभार प्रदर्शन शेख यांनी केले. चंदा मुरकुटे, जयंत धनवलकर, विलास केजरकर, मोहन भाकरे, दिनेश मेश्राम, पद्माकर फडके, नीता मलेवार आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)