शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उद्यानात झाडे वाळली, खेळणीही तुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 06:00 IST

शहरातील सिव्हील लाईन शासकीय वसाहतीत जिल्हा वार्षिक योजना, नाविण्यपुर्ण योजनेतून २०१४-१५ मध्ये उद्यान्याचे बांधकाम करण्यात आले. ६ मे २०१५ रोजी या उद्यान्याचे रितसर उद्घाटन झाले. परिसरातील नव्हे तर शहरातील सर्वांना मोठा आनंद झाला होता. याठिकाणी लावण्यात आलेली खेळणी बालकांना आकर्षित करीत होती.

ठळक मुद्दे मोकाट जनावरांचे वास्तव्य : सिव्हील लाईन उद्यानाची दुरावस्था, चिमुकल्यांचा हिरमोड

संतोष जाधवर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहराच्या वैभवात भर घालण्यासाठी नगर परिषदेने ठिकठिकाणी उद्यान्याची निर्मिती केली आहे. लाखो रुपये खर्च करण्यात आले. मात्र देखभाल दुरुस्तीअभावी बहुतांश उद्यान्यांची अवस्था सपाट मैदानात होत आहे. सिव्हील लाईन परिसरातील उद्यान्यात तर झाडे वाळली असून खेळणीही तुटलेली आहे. मोकाट जनावरांचे वास्तव्य राहत असून चिमुकल्यांचा हिरमोड होत आहे.शहरातील सिव्हील लाईन शासकीय वसाहतीत जिल्हा वार्षिक योजना, नाविण्यपुर्ण योजनेतून २०१४-१५ मध्ये उद्यान्याचे बांधकाम करण्यात आले. ६ मे २०१५ रोजी या उद्यान्याचे रितसर उद्घाटन झाले. परिसरातील नव्हे तर शहरातील सर्वांना मोठा आनंद झाला होता. याठिकाणी लावण्यात आलेली खेळणी बालकांना आकर्षित करीत होती. चिमुकले या उद्यान्यात जाण्यासाठी हट्ट धरुन बसत होती. काही काळ सुस्थितीत असलेले हे उद्यान आता सपाट मैदानात बदलू लागले आहे. मैदानात ठिकठिकाणी कापलेल्या गवताच्या ढिग पडले आहे. येथील सुरक्षा रक्षकाला वेळेवर मानधन मिळत नसल्याने तोही दुर्लक्ष करीत आहे.आता या उद्यान्यात मोकाट जनावरांचा हैदोस सुरु असतो. पाण्याअभावी वृक्ष वाळली असून काही खेळणीही मोडकडीस आली आहे. लहान मुले याठिकाणी खेळण्यासाठी जातात. परंतु तेथील अवस्था पाहून पालक त्यांना या खेळण्यावर खेळण्यास मनाई करतात.नगर परिषदेच्या अखत्यारित असलेल्या या उद्यान्याच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने ही अवस्था झाल्याचे या परिसरातील नागरिक सांगतात. पुर्वी येथे सायंकाळच्या वेळी वृध्द निवांतक्षणी गप्पा मारायचे, लहान मुलांची किलबील ऐकु यायची परंतु आता सर्व काही शांत झाले आहे. एखाद्या खंडहरमध्ये या बगीच्याचे रुपांतर होऊ पाहत आहे. परिसरातील नागरिकांनी याबाबत वारंवार नगर परिषदेला सुचना दिल्या. परंतु कुणीही लक्ष दिले नाही. शहरातील सर्वच उद्यान्यांची दुरावस्था झाली असताना एकमेव उद्यान सुस्थितीत होते. आता तेही मोडकडीस आले आहे.या उद्यान्याची तात्काळ दुरुस्ती करण्यासाठी नगर परिषदेने गरज निर्माण झाली आहे.मिस्किन टँक, समता नगरातील उद्यान मोडकळीसभंडारा शहरातील मिस्किन टँक आणि समता नगरातील उद्यानाची प्रचंड दुरावस्था झाली आहे. मिस्किन टँक परिसरातील रनिंग ट्रॅक अरुंद झाला आहे. त्यामुळे सकाळी येथे फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खांबतलाव परिसरातील उद्यान तर तारगट तरुणांचा अड्डा झाला आहे. याठिकाणी रात्रीच्या वेळी ओपन बार भरविला जातो. मद्याच्या बॉटल आणि खाद्यपदार्थांचे पाकीट येथेच फेकली जातात. शहराच्या इतर भागातील उद्यानांचीही अवस्था फारशी चांगली नाही. परंतु नगर परिषद या उद्यानांच्या विकासासाठी कोणतीच पाऊले उचलत नसल्याने नागरिकांत संताप आहे.