शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवड ही भविष्यात लोकचळवळ व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 21:59 IST

मनुष्याला जीवन जगण्यासाठी हवा, पाणी व शुध्द पर्यावरणाची आवश्यकता असते. जे झाडामुळे आपणास मिळते. झाडे व जंगल असल्यामुळे पर्यावरण संतुलित राहते.

ठळक मुद्देरामचंद्र अवसरे : भंडारा येथे वृक्ष लागवडीचा मुख्य कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मनुष्याला जीवन जगण्यासाठी हवा, पाणी व शुध्द पर्यावरणाची आवश्यकता असते. जे झाडामुळे आपणास मिळते. झाडे व जंगल असल्यामुळे पर्यावरण संतुलित राहते. म्हणून प्रत्येकानी आपल्या घरासभोवताल प्रत्येकी २ झाडे लावण्याचा निर्धार करावा व वृक्ष लागवडीस लोकचळवळीचे स्वरुप दयावे, असे प्रतिपादन आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांनी केले.जिल्हयातील १३ कोटी वृक्ष लागवडीचा मुख्य कार्यक्रम खांब तलाव भंडारा येथे आज अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी शांतनू गोयल, पोलीस अधिक्षक विनीता साहू, उपवन संरक्षक विवेक होशिंग, नगराध्यक्ष सुनिल मेंढे, उपाध्यक्ष आशिष गोंडाणे, उपविभागीय अधिकारी प्रविण महिरे, तहसिलदार संजय पवार, जिल्हा परिषदेचे उप कार्यकारी अधिकारी आर.एन. दिघे, सामाजिक वनीकरणचे उपसंचालक विधाते, मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांची प्रमुख उपस्थिती होती.जिल्हाधिकारी शांतनू गोयल म्हणाले की, जिल्हयाचा वृक्ष लागवडीचा उद्दिष्टय २४.५८ लाख असून १ ते ३१ जुलै पर्यंत या उद्दिष्टयापेक्षा जास्त वृक्ष लागवड करण्यात येईल. जिल्हयातील सर्व तालुक्यात मोठया प्रमाणात वृक्ष लागवड करावी व त्यात नागरिकांचा सहभाग घ्यावा. वृक्ष लागवड करुन त्याचे संगोपन करावे, असे त्यांनी सांगितले. तसेच प्रत्येक कर्मचाऱ्यांनी सुध्दा वृक्ष लावून त्यांचे संगोपन करावे, असे ते म्हणाले.पोलीस अधीक्षक विनीता साहू म्हणाल्या की, घरोघरी वृक्ष लागवड करुन त्याचे संवर्धन करा. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड करणे काळाची गरज झाली आहे. नगरपरिषदेला २ हजार ५०० उद्दिष्टय दिलेले असून यावर्षी ३ हजार ५०० झाडे शहरात लावण्यात येणार आहे. भंडारावासियांनी या वृक्ष चळवळीस सहकार्य करुन भंडारा शहर हिरवेगार करावे, असे आवाहन नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सुनिल मेंढे यांनी केले. प्रास्ताविकात उपवन संरक्षक विवेक होशिंग यांनी १३ कोटी वृक्ष लागवडीबाबत माहिती दिली. तसेच जिल्हयाला दिलेल्या उद्ष्टिांपेक्षा जास्त वृक्ष लावण्याचा नागरिकांनी संकल्प करावा, असे सांगितले. जिल्हयात सर्व तालुक्यात वृक्ष लागवडीचा कार्यक्रमास उर्त्स्फूत प्रतिसाद लाभत असून ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा, खाजगी शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, खाजगी स्वयंसेवी संस्था, खाजगी उद्योग सर्वत्र वृक्ष लागवड जोमाने सुरु असून वृक्ष लागवडीस लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.संचालन व उपस्थिताचे आभार नगरपरिषदेचे प्रकल्प अधिकारी प्रवीण पडोळे यांनी केले.