शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

लाकूड माफियांकडून वृक्षतोड जोमात

By admin | Updated: June 23, 2017 00:23 IST

संपूर्ण राज्यात ४ कोटी वृक्षलागवडीची धडपड सुरू असताना भंडारा जिल्ह्यात मात्र अपरिपक्व व पूर्णवाढ झालेल्या वृक्षांची सर्रासपणे कत्तल केली जात आहे.

भंडारा जिल्ह्यात विदारक स्थिती : विनापरवाना झाडांची कत्तल, वनविभागाचे अक्षम्य दुर्लक्षलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : संपूर्ण राज्यात ४ कोटी वृक्षलागवडीची धडपड सुरू असताना भंडारा जिल्ह्यात मात्र अपरिपक्व व पूर्णवाढ झालेल्या वृक्षांची सर्रासपणे कत्तल केली जात आहे. वृक्ष कापण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नाही. जिल्ह्यात ठिकठिकाणी कापलेल्या लाकडांचा खच पडून असला तरी वन विभागाचे याकडे अजिबात लक्ष नाही. खासगी शेतजमिनीवरील झाडे कापण्यासाठी वन विभागाकडून रितसर परवानगी घेणे आवश्यक असते. वन विभागाच्या भाषेत त्याला खसरा प्रकरण असे म्हणतात. त्यासाठी शेतीच्या सातबारासह विविध कागदोपत्री कारवाई केल्यानंतर खसरा प्रकरण मंजूर होऊन झाड कापण्याची परवानगी दिली जाते. भंडारा वन विभागात एकूण १० वनपरिक्षेत्र आहेत. या सर्वच वनपरिक्षेत्रातून कापणीसाठी मंजूर झालेल्या झालेल्या झाडांव्यतिरिक्त जंगलातील झाडे कापून त्या झाडांमध्ये मिसळविले जातात. व झाडे नियमानुसार कापल्याचे सांगण्यात येते. भंडारा वनक्षेत्रातील सातोना, दाभा, मोहदूरा, टवेपार, तुमसर वनक्षेत्रातील करडी, मुंढरी, मोहगाव देवी, लेंडेझरी वनक्षेत्रातील रोंघा यासह सर्वच वनक्षेत्रात बेसुमार झाडांची कत्तल करण्यात आली आहे. या झाडांना एका ठिकाणी रचून नंतर त्यांची विल्हेवाट लावली जात आहे. जिल्ह्यातील शेतात असलेल्या एकूण झाडांचा विचार केल्यास रचून ठेवलेल्या झाडांची संख्या प्रचंड मोठी आहे. त्यामुळे ती झाडे जंगलातून नियमबाह्यरित्या तोडल्या गेली आहेत, ही बाब स्पष्ट होते. दरम्यान, हा प्रकार वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहित असतानाही वन विभागाने कोणतीही हालचाल केलेली नाही. कापण्यात आलेल्या झाडांमध्ये सागवान, आंबा, निम, अंजन, मोह, बोरी, किन्ही यासह अन्य महत्वाच्या व आडजात झाडांचा समावेश आहे. अपरीपक्व झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणात होत आहे. खसराधारक अनेक असताना एकाच्याच नावाने खसरा बनविण्यात येत आहेत.७ लाख ६८ हजार रोपांची लागवडभंडारा जिल्ह्यात १ जुलै ते ७ जुलै या कालावधीत ७ लाख ६८ हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या अभियानात लोकसहभाग मोठ्या प्रमाणावर राहणार असून फक्त एक झाड लावा व वसुंधरेचे पाईक व्हा, असे आवाहन वनविभागाने केले आहे. तर याच जिल्ह्यात लाकुड माफियांनी वन कर्मचाऱ्यांशी संधान साधून झाडांची प्रचंड तोड केल्याचे पुढे आले आहे. एकीकडे झाडे लावायचे आणि दुसरीकडे पूर्ण वाढ झालेल्या झाडांची कत्तल करायची, असा प्रकार भंडारा वन विभागात सुरू आहे. दुर्लक्षित धोरणभंडारा जिल्ह्यात वृक्षतोड जोमात सुरू असले तरी कारवाई मात्र नगन्य आहे. पावसाळ्याच्या तोंडावर शेतशिवारातील वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आली होती. खसऱ्याच्या नावाखाली ही वृक्षकटाई असली तरी नियमबाह्यपणे कामे केली जात असल्याची ओरड वृक्षपे्रमींनी केली आहे. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालणे गरजेचे आहे.