शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

हजारो मैलांचा प्रवास करून ‘श्याम कादंब’ भंडाऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 21:32 IST

परदेशी पक्षी म्हणून ओळख प्राप्त असलेल्या श्याम कादंब हे पक्षी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात दाखल झालेले आहेत. भंडारा नजीकच्या शिवार तलाव व गाव तलावांमध्ये यांचे बस्तान दिसून येत आहे. परिणामी हे परदेशी पाहुणे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत.

ठळक मुद्देपरदेशी पाहुणे पक्षी : तलावावरील जलविहार ठरतेय आकर्षणाचा केंद्रबिंदू

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : परदेशी पक्षी म्हणून ओळख प्राप्त असलेल्या श्याम कादंब हे पक्षी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात दाखल झालेले आहेत. भंडारा नजीकच्या शिवार तलाव व गाव तलावांमध्ये यांचे बस्तान दिसून येत आहे. परिणामी हे परदेशी पाहुणे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत.श्याम कादंब हे पक्षी बलूचीस्थान, अझरबैजान, इराण, पाकीस्तान, बांगलादेश आणि पूर्वेकडे असलेल्या चीन सीमेलगतच्या हिमालय पर्वतरांगा ओलांडून अन्नाच्या शोधात स्थलांतर करून भारतात येत असतात. विशेष म्हणजे भंडारा जिल्ह्यात हजारो किलोमीटरचा प्रवास करून हे पक्षी डेरेदाखल होतात.या पक्ष्यांची चोच गुलाबी रंगाची असून आकाराने हे मोठे असतात. या पक्ष्यांची लांबी ७४ ते ९१ सेंटीमीटरपर्यंत असते. यांचे सरासरी वजन तीन ते साडेतीन किलोपर्यंत असते. जगभरात त्यांचे अस्तित्व युरोप आणि आशियाच्या पर्वतरांगांच्या मध्यंतरी दिसून येते. हे पक्षी उबदार ठिकाणी वास्तव्यासाठी दक्षिणेकडे प्रवास करीत असतात.प्राचीन ग्रीस आणि रोम मध्ये ते प्रेमाची देवी ‘अ‍ॅफ्रोडाईट’ म्हणून संबोधित केले जाते. ‘पट्टकादंब’ (बार हेडेड गुज) आणि इतर परदेशी पक्षी हिवाळ्यात नागपूरसह परिसरात दरवर्षी येत असतात. परंतु मागील तीन वर्षात श्याम कादंब या पक्ष्यांची संख्या ५० पेक्षा जास्त दिसून आली.भंडारा जिल्ह्यात एवढ्या मोठ्या संख्येत पहिल्यांदाच या पक्ष्यांची नोंद करण्यात आली. पक्षी प्रेमी आणि व्यवसायाने दंतरोग चिकित्सक असलेले डॉ.स्वप्नील धारगावे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, हिवाळ्यातील तापमानात दरवर्षी होत जाणाºया वाढीमुळे या पक्ष्यांचे आगमन रोडावले आहे. परंतु असे असतानाही भंडारा जिल्ह्यात मोठ्या संख्येने त्यांचे आगमन होणे ही चांगली बाब आहे.दिवसेंदिवस होत असलेला पर्यावरणाचा ऱ्हास, पृथ्वीचे वाढते तापमान या दोन गोष्टींमुळे पर्यावरणात असमतोल निर्माण होऊन त्याचा प्रभाव भूमंडलीय वातावरणात होत आहे. परिणामी उष्णता वाढत असल्याने हिमालयावरील बर्फही मोठ्या प्रमाणात वितळत असते. समुद्राची पातळी किंचित का असेना वाढत असली तरी याचा परिणाम पशुपक्ष्यांवर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. याचेच उदाहरण म्हणजे श्याम कादंब होय. वातावरणाच्या शोधात हे पक्षी स्थलांतर होत असल्याचे दिसून येते. दुसरीकडे जीभेची चोचले पुरविण्यासाठी या पक्ष्यांची शिकारही केली जाते. सदर पक्ष्यांच्या शिकारींच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पक्षी प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. यावर वनविभागाने दिशानिर्देश देणे गरजेचे आहे.