शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांचे पुष्पगुच्छाने स्वागत करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 00:46 IST

लोकवाहिनी असलेल्या राज्य परिवहन महामंडळाला १ जूनला ७१ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त होणाऱ्या वर्धापन दिनासाठी एसटी महामंडळ राज्यभरातील आगारामध्ये विविध उपक्रम साजरा करीत आहे. या उपक्रमामध्ये प्रवाशांना उत्तम सेवा देण्यावर भर दिला आहे. सोबतच काही चालक वाहकांचा आज सन्मान होणार आहे.

ठळक मुद्देएसटीचा आज वर्धापन दिन : चालक वाहकांचा होणार सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : लोकवाहिनी असलेल्या राज्य परिवहन महामंडळाला १ जूनला ७१ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त होणाऱ्या वर्धापन दिनासाठी एसटी महामंडळ राज्यभरातील आगारामध्ये विविध उपक्रम साजरा करीत आहे. या उपक्रमामध्ये प्रवाशांना उत्तम सेवा देण्यावर भर दिला आहे. सोबतच काही चालक वाहकांचा आज सन्मान होणार आहे.वर्धापन दिनाचे औचित्य साधून एसटीच्या ताफयातील सर्व बसगाड्या आतून आणि बाहेरुन साफ करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना एसटीचा प्रवास आल्हादायक वाटेल. बसस्थानके सुशोभीत करण्यात येणार असून या दिवसाचे महत्व प्रवशांना कळावे यासाठी प्रवाशांना फुल देऊन स्वागत करण्यात येणार आहे.प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवून विविध कार्यक्रम आखले आहेत. महामंडळाच्या राज्यभरातील २५२ आगारामध्ये हे कार्यक्रम दिवसभर होणार आहेत. विशेष म्हणजे या दिवशी एसटीचे अधिकारी बस स्थानकावर प्रवाशांसी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत, अशी माहिती साकोली येथील अधिकाऱ्यांनी सांगितली.परिवहन दिन ऐवजी वर्धापन दिनस्वातंत्र्यानंतर अहमदनगर-पुणे या मार्गावर एसटी महामंडळाची पहिली बस १ जून १९४८ रोजी धावली, तेव्हापासून हा दिवस वर्धापन दिवस म्हणून साजरा केला जातो. मागील काही वर्षे हा दिवस परिवहन दिन म्हणून साजरा केला जात होता.अधिकारी, कर्मचारी घेणार शपथमहामंडळाची बस्थानके सुशोभित, केळीचे खांब, आंब्याच्या पानाचे तोरण बांधणे, सजावट करणे, रांगोळ्या, मंद आवाजात सनई वादन, सर्व कर्मचारी व अधिकारी यांना महामंडळाच्या निष्ठेबाबत व प्रयत्नशील राहण्याबाबत शपथ देण्यात येणार आहे.बसस्थानक सुशोभित करण्यात येईल. ध्वनीप्रक्षेकाद्वारे महामंडळाच्या विविध योजना व सुविधांची माहिती सर्व बसगाड्या आतून बाहेरुन साफ करण्यात येणार आहे. या दिवसाचे आगळे वेगळे स्वरुप प्रवाशांना जाणवले पाहिजे, असे विविध उपक्रम राबविणार आहेत.- गौतम शेंडे,आगार व्यवस्थापक, साकोली