शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

प्रवाशांनो जरा जपून, पाकिटमार फिरताहेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 23:31 IST

अत्याधुनिक होत असलेले गोंदियाचे रेल्वे स्थानक सध्या पॉकिटमारीच्या घटनांनी कुप्रसिद्ध होत आहे.

ठळक मुद्देपॉकिट फेकतात रेल्वे रूळावर : गाडीत चढताना घडतो प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अत्याधुनिक होत असलेले गोंदियाचे रेल्वे स्थानक सध्या पॉकिटमारीच्या घटनांनी कुप्रसिद्ध होत आहे. रेल्वे गाडी फलाटावर थांबताच प्रवासी गाडीत चढण्याच्या तयारीत असताना नेमक्या त्याच वेळी अनेक प्रवाशांच्या पँटच्या मागील खिशातून पॉकिट गायब होतो. अशा अनेक घटना सांगण्यासाठी प्रवासी रेल्वे पोलीस ठाणे गाठत आहेत.गोंदियाच्या रेल्वे स्थानकावर वाढणाºया पॉकिटमारीच्या घटनांकडे रेल्वे पोलिसांनी लक्ष देवून पॉकिटमारांना पकडणे गरजेचे आहे. गाडीत चढणाºया प्रवाशांचे पॉकिट मारले जाते, त्यानंतर त्यातील रूपये काढून काही वेळाने ते पॉकिट इतरत्र फेकलेसुद्धा जाते. विशेष म्हणजे रूपये काढून गाडीतील शौचालयाच्या ठिकाणातून रेल्वे रूळावर फेकले जाते. त्यामुळे रेल्वे रूळावर पैसे नसलेले अनेक पॉकिटही आढळले आहेत.उल्लेखनिय म्हणजे प्रवाशांच्या पॉकिटातील केवळ पैसेच काढून फेकले जातात. मात्र पॉकिटात पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, एटीएम कार्ड तसेच ठेवल्याचेही आढळले आहेत. तसेच पॉकिटात एखाद्याचा संपर्क क्रमांक आढळला तर रेल्वे पोलीस त्या क्रमांकावर संपर्क साधून पॉकिट व पॉकिटातील साहित्य त्यांना परत करण्याचे सौजन्य दाखवितात. मात्र पॉकिटमारांवर कारवाई होताना किंवा प्रवासी गाडी आल्यावर पॉकिटमारांवर किंवा चोरांवर नजर ठेवण्यासाठी रेल्वे पोलीस कुठेही दिसत नाही. तीन दिवसांपूर्वीच शासकीय नोकरीत कार्यरत युवकाचे पॉकिट गोंदियाच्या रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म-३ वर सायंकाळी पॅसेंजर गाडीत चढताना चोरट्याने लांबविले. गाडीत बसल्यानंतर त्या युवकाला आपल्या खिशात पर्स नसल्याचे जाणवले. त्यात अडीज हजार रोख, ड्रायव्हिंग लायसन्स, एटीएम कार्ड साहित्य होते.दुसºया एका घटनेत महिनाभरापूर्वी एका अपडाऊन करणाºया कर्मचाºयाला प्लॅटफॉर्म-३ च्या रेल्वे रूळावर पॉकिट पडून असल्याचे आढळले. त्याने तो पॉकिट उचलून पोलीस ठाण्यात नेवून दिले. त्या पॉकिटात गोंदियातीलच इसमाचे ओळखपत्र, संपर्क क्रमांक, एटीएम कार्ड आदी साहित्य होते.त्यामुळे पोलिसांनी त्याच्याशी संपर्क साधून पॉकिट व आतील साहित्य त्याला परत दिले. सर्व अधिकतर पॉकिटमारी प्रकरणात केवळ रोख पैसे काढून इतर साहित्य पॉकिटसह फेकून दिले जातात.