शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

खोदलेल्या रस्त्यावरून तुमसरकरांची जीवघेणी वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 21:20 IST

तुमसर शहरातील प्रमुख बावनकर चौक ते जुने बसस्थानक दरम्यान रस्ता पाच दिवसापूर्वी सिमेंट रस्ता बांधकामाकरीता खोदण्यात आला. परंतु प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही. या मार्गावरुन नागरिक जीव धोक्यात घालून मार्गक्रमण करीत आहेत. निवडणूक आचारसंहितेपूर्वी घाईगर्दीत रस्ता खोदकाम करण्यात आले, हे विशेष.

ठळक मुद्देसिमेंट रस्ता बांधकामाची गरज : बावनकर चौक ते जुन्या बसस्थानकादरम्यानचा रस्ता

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर शहरातील प्रमुख बावनकर चौक ते जुने बसस्थानक दरम्यान रस्ता पाच दिवसापूर्वी सिमेंट रस्ता बांधकामाकरीता खोदण्यात आला. परंतु प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही. या मार्गावरुन नागरिक जीव धोक्यात घालून मार्गक्रमण करीत आहेत. निवडणूक आचारसंहितेपूर्वी घाईगर्दीत रस्ता खोदकाम करण्यात आले, हे विशेष.बावनकर चौक ते जूने बसस्थानक चौक हा मेन रोड आहे. शहरातील प्रमुख चौक व रस्ता आहे. वर्दळीचा तथा शहरातील मुख्य बाजारात, नगरपालिकेत व इतर कार्यालयात जाणारा महत्वपूर्ण रस्ता आहे. सिमेंट रस्ता बांधकाम येथे दुसऱ्या टप्प्यात सुरु करण्यात आले. यापुर्वी रेल्वे फाटक ते गभने सभागृहापर्यंत सुमारे १२०० मीटर रस्ता सिमेंटीकरण करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. निवडणूक आचार संहिता लागण्यापूर्वी सदर डामरी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले. त्यानंतर दोन्ही बाजूला लोखंडी आडवे कठडे लावण्यात आले. दरम्यान नागरिकांत विनोबा भावे बायपास रस्त्याने, बजाज नगरातून ये-जा करावे लागत आहे.चार दिवसानंतर रस्ता बांधकामाकरीता संबंधित विभागाकडून काहीच हालचाल करण्यात आली नाही. लोखंडी कठडे रस्त्याच्या बाजूला करुन पुन्हा खड्डेमय, गिट्टीमय खोदकाम केलेल्या रस्त्यावरुन वाहतुक सुरु झाली. धोकादायक रस्त्याने येथे वाहतूक सुरु आहे. एकीकडे संपूर्ण रस्ता खोदकाम केल्यावर तात्काळ सिमेंटीकरण रस्ता बांधकामाला सुरुवात का करण्यात येत नाही. आता प्रश्न तुमसरकरांनी उपस्थित केला आहे. कासवगतीने कामे केली तर किमान तीन ते चार महिने येथे लागतील काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.पहिल्या टप्प्यातील सिमेंट रस्ता बांधकामाला सुमारे नऊ महिन्यांचा काळ लागला येथेही तीच स्थिती राहील काय! सदर रस्ता बांधकामावर मोहाडी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नियंत्रणात आहे. शहरातून रस्ता बांधकाम करतांनी संबंधित विभागाने निश्चितच नियोजन केले असावे. परंतु यापूर्वीचा अनुभव तुमसरकरांना चांगला आला नाही. किमान या खेपेला जलद गतीने सिमेंट रस्ता बांधकाम करावे अशी मागणी जोर धरत आहे.