शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

परीविक्षाधीन नायब तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात

By admin | Updated: April 10, 2015 00:41 IST

गौण खनिज वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टर चालकाकडून दरमहा हप्ता वसूल करणाऱ्या लाखांदूर येथे कार्यरत परीविक्षाधीन नायब तहसिलदाराला आज गुरुवारला दुपारी ३.४० वाजता ...

लाखांदूर : गौण खनिज वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टर चालकाकडून दरमहा हप्ता वसूल करणाऱ्या लाखांदूर येथे कार्यरत परीविक्षाधीन नायब तहसिलदाराला आज गुरुवारला दुपारी ३.४० वाजता त्यांच्या कक्षात सेवानिवृत्त अव्वल कारकून विनायक बाळबुद्धे याच्यामार्फत चार हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.परीविक्षाधीन नायब तहसिलदार सागर कांबळे व विनायक बाळबुद्धे (६०) अशी आरोपींची नावे आहेत. सन २०१३ च्या बॅचचे कांबळे हे लाखांदूर तहसील कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून रूजू झाले. १८ महिन्याच्या परिविक्षाधीन कालावधी संपण्यासाठी १० दिवस शिल्लक असून त्यापूवीरच एसीबीच्या जाळ्यात अडकण्याची त्याच्यावर वेळ आली. बाळबुद्धे हे तहसील कार्यालयातून अव्वल कारकून पदावरुन सेवानिवृत्त झाले आहेत. कामाचा अनुभव असल्यामुळे त्याला तहसील कार्यालयात मानधनावर ठेवण्यात आले होते. बोथली नदीघाटावरून रेतीची वाहतूक करताना कांबळे यांनी तक्रारदाराला ५ एप्रिलला पकडले होते. त्यानंतर ट्रॅक्टर जप्त करुन नियमानुसार दंड आकारण्यात आला. त्यानंतर दिघोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र कांबळे यांनी तक्रारदाराला तहसील कार्यालयात बोलावून दरमहा पाच हजार रूपये देऊन गौण खनिज न्या, असे सांगितले. त्यानंतर तक्रारदाराने भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. त्यानुसार गुरुवारला दुपारी नायब तहसिलदार कांबळे यांच्या कक्षात विनायक बाळबुद्धे याच्यामार्फत चार हजार रूपये घेताना पथकाने पकडले. याप्रकरणी लाखांदूर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस उपअधिक्षक प्रशांत कोलवाडकर यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक किशोर पर्वते, जीवन भातकुले, अशोक फुलेकर, सचिन हलमारे, शेखर देशकर, गौतम राऊत, मनोज पंचबुद्धे, पराग राऊत, श्रीकांत हत्तीमारे, विनोद शोवणकर यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)