सौजन्य सप्ताह : फूल देऊन प्रवाशांचे स्वागतसाकोली : येथील एसटी महामंडळतर्फे परिवहन दिन साजरा करण्यात आला. प्रवाशाचे फुल देवून स्वागत करण्यात आले, बसस्थानक सुशोभीत केळीचे खांब, आंब्याचे पानाचे तोरण बांधून स्वच्छता व फुलांची सजावट करण्यात आली होती.सौजन्य सप्ताह प्रचार मोहिम साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. हेमकृष्ण कापगते, विद्युत अभियंता वंजारी, आगार व्यवस्थापक एच.एल. धोंडणे, पी.एन. गोल्हर, बी.एन. राऊत उपस्थित होते. उत्कृष्ट केपीटीएल चालक ए.डी. निर्वाण, वाहक पी.एच. हटवार, जास्त उत्पन्न आणणारे यांत्रिक वर्गात उत्कृष्ट कामगिरी करणारे व्ही.आर. फुलसुंगे, व्ही.जे. बोरकर यांचा सत्कार करण्यात आला. बसस्थानकावर महामंडळाच्या विविध योजना व सुविधाची माहिती प्रवाशांना देण्यात आली. सर्व अधिकारी व कर्मचारी यांना महामंडळाच्या निष्ठेबाबत व महामंडळाच्या प्रयत्नशील राहण्याबाबत शपथ देण्यात आली. प्रवाशांना फुल देवून स्वागत करण्यात आले. त्यावेळी या दिवसाचे आगळे वेगळे स्वरूप प्रवाशांना जाणवले होते. बसस्थानकावर आगार व्यवस्थापक एच.एल. धोंडणे यांनी प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. (शहर प्रतिनिधी)
साकोली आगारात परिवहन दिन
By admin | Updated: June 2, 2015 00:30 IST