शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

तरुणाईमुळे गावाचा कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 23:54 IST

भावी पिढीला तंदुरूस्त करण्यासाठी गावाला स्वच्छ व सुंदर करणे काळाची गरज आहे.

ठळक मुद्देडी. एस. बिसेन : गुंजेपार येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे आयोजन

आॅनलाईन लोकमतभंडारा : भावी पिढीला तंदुरूस्त करण्यासाठी गावाला स्वच्छ व सुंदर करणे काळाची गरज आहे. याकरिता दरवर्षी ग्रामस्तरावर घेण्यात येणारे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर महत्वाचे माध्यम ठरते आहे. महाविद्यालयीन तरुणाईची शक्ती आणि गावकºयांचा सहभाग असेल आपला गाव स्वच्छ सुंदर व निरोगी करता येऊ शकते. असे प्रतिपादन कार्यक्रम व्यवस्थापक डी. एस. बिसेन यांनी केले.स्वामी रामानंद तिर्थ कला व वाणिज्य महाविद्यालय मासळच्या पुढाकारातून लाखांदूर तालुक्यातील गुंजेपार (किन्ही) येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी सरपंच उत्तम भागडकर, काँग्रेसच्या प्रमिला कुटे, काशिनाथ हुमणे, लाखांदूरचे ठाणेदार बन्सोडे, उपसरपंच ब्रम्हदास देशमुख, प्रकाश नाकतोडे, हर्षवर्धन हुमणे, अंकुश गभणे, अजय गजापुरे, राजेश येरणे, नेत्रदिपक बोडखे, नागपुरे, देवानंद कावळे, राजाराम सोनटक्के, कुटे, राजाराम देशमुख, मुकुंदराव देशमुख, नितीन हुमणे, प्रा. मोटघरे, नवनाथ सोनटक्के आदींची उपस्थिती होती.यावेळी हुमणे यांनी, गुंजेपार येथे होवून घातलेल्या मागील वर्षीच्या शिबिराच्या आठवणी सांगून गावात विविध कार्यक्रम व पाणी व स्वच्छतेतून परिवर्तन घडविण्यात येणार असल्याचे सांगितले.सरपंच भागडकर यांनी, रासेयो शिबिराच्या माध्यमातून नागरिकांत सामाजिकतेची भावना जागविण्याचे कार्य होत आहे. सर्वंनी घरासमोरील साचलेला कचरा व नालीत थांबलेले पाणी स्वच्छ करण्यासाठी जे नागरिक पुढाकार घेतात, हेच राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे यश असल्याचे भागडकर यांनी सांगितले. गावात विकासाचे परिवर्तन करायचे असेल तर लोकसहभाग आवश्यक आहे. संघटीत झाल्याशिवाय यश मिळणार नाही, असे त्यांनी प्रतिपादन केले.प्रमिला कुटे यांनी, एकमेकांना सहाय्य करू, अवघे धरु सुपंथ, या म्हणीप्रमाणे गावात नागरिकांनी एकमेकाला सहाय्य करून पुढाकार घेतला तर गावाला स्वच्छ व सुंदर करण्यास वेळ लागणार नाही. विविध कार्यात गावात नावलौकीक करता येईले. जसा विद्यार्थी हा शिष्य व शिक्षक हा गुरु असतो त्याचप्रमाणे आईवडीलही गुरु आहेत. मुल आणि आईवडीलात ज्या प्रमाणे मित्रत्वाचे नाते असेल तर तो कुटुंब सुखी व समृद्ध होते. त्याचप्रमाणे गावकरी एकत्र होवून मित्रत्वाप्रमाणे वागले तर गावातील सामाजिक बदल घडविता येईल, असे प्रतिपादन केले.याप्रसंगी ठाणेदार बन्सोडे यांनी, गावात शांतता प्रस्थापित ठेवण्यासाठी सलोख्याचे संबंध निर्माण करावे, व्यसनमुक्त समाज करण्यावर भर देऊन गाव स्वच्छ व सुंदर करण्याचे प्रतिपादन केले. यावेळी विद्यार्थी, महिला व पुरूषांची मोठी उपस्थिती होती.