शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बदलीप्रकरण लोकायुक्तांच्या दालनात

By admin | Updated: January 13, 2017 00:16 IST

मे २०१६ मध्ये भंडारा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. यातील काही बदल्या नियमबाह्य झाल्याची तक्रार

मुंबईत सुनावणी : लोकायुक्तांच्या निर्णयाकडे शिक्षकाचे लक्षतुमसर : मे २०१६ मध्ये भंडारा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. यातील काही बदल्या नियमबाह्य झाल्याची तक्रार राज्याच्या लोकायुक्तांकडे करण्यात आली. त्या तक्रारीवर १२ जानेवारी रोजी सुनावणी होत आहे. या सुनावणीस राज्याचे शिक्षण अवर सचिव जि.प. चे संबंधित अधिकारी व तक्रारदार शिक्षकाने उपस्थित राहावे असे आदेश प्राप्त झाले आहे.भंडारा जिल्हा परिषद प्राथमिक ३७६ शिक्षकांच्या बदली प्रक्रिया जिल्हा परिषद प्रशासनाने राबविली होती. मे २०१६ मध्ये बदल्या झाल्या होत्या. बदली स्थळी काही शिक्षक रुजू झाले नाही. यापैकी चार शिक्षकांनी स्वत:च्या बदली प्रक्रियेला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे ते बदली झालेल्या शाळेत रुजू झाले नाही. यापैकी दावेझरी टोला येथील मुख्याध्यापक अ. वा. बुध्दे यांनी आपल्या बदली संदर्भात राज्याच्या लोकायुक्तांकडे रितसर सर्व पुराव्यानिशी तक्रार दाखल केली. लोकायुक्तांनी तक्रारीची दखल घेतली. १२ जानेवारीला मुंबई येथे लोकायुक्त टहलानी यांच्या दालणात राज्य शासनाचे सचिव, भंडारा जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी, तक्रारकर्ते शिक्षक अ. वा. बुध्दे यांची सुनावणी ठेवली आहे. तत्पूर्वी ग्रामविकास मंत्रालयाने संपूर्ण बदली प्रक्रियेला स्थगिती दिली होती. नंतर पुन्हा स्थगिती उठविण्यात आली. बदली झालेले शिक्षक रुजू झाले. सध्या बदली स्थळी रुजू न झालेल्या चार शिक्षकांचे वेतन थांबविण्यात आले आहेत. याला आठ महिन्याचा कालावधी लोटला आहे. लोकायुक्तांच्या निर्णयामुळे भंडारा जिल्ह्यातील जि.प. शिक्षकांचे लक्ष लागून आहे. (तालुका प्रतिनिधी)