शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

तुमसरात गांजा विकणारी परप्रांतिय टोळी सक्रीय

By admin | Updated: January 6, 2017 00:54 IST

तुमसर शहरात मादक पदार्थ गांजा विक्री सुरू असल्याची माहिती आहे. परप्रांतीय हा गांजा विक्री करीत आहेत.

अंमली पदार्थाच्या विळख्यात तरूण तुमसर : तुमसर शहरात मादक पदार्थ गांजा विक्री सुरू असल्याची माहिती आहे. परप्रांतीय हा गांजा विक्री करीत आहेत. विशेषत: बिहार राज्यातील युवक शहराच्या एका टोकावर हा गांजा विक्री करीत आहेत. याबाबत पोलीस प्रशासन अनभिज्ञ दिसत आहे. शहरात मादक पदार्थ गांजा विक्री करणे सुरू आहे. देव्हाडी मार्गावर तलाव परिसरात युवकांची टोळी यात सक्रीय आहे. बिहार राज्यातून तुमसर शहरात गांजाची खेप येत असल्याची माहिती आहे. गांजा विक्री करणारे बिहार राज्याचे रहिवाशी असल्याचे समजते. तुमसर शहरात हा गांजा रेल्वेने मागाने येत असल्याची माहिती आहे. रेल्वे प्रवाशी गाडीत हा अंमली पदार्थ सुरक्षित येथे आणला जातो. दर आठवड्याला येथे गांजाची खेप येते. तुमसर मुख्य केंद्र असून येथून तो भंडारा, बालाघाट व नागपूरपर्यंत जात असल्याची माहिती आहे. देव्हाडी मार्ग हा गर्दीचा रस्ता आहे. गांजा विक्री करणारी टोळी चारचाकी बसून गांजा विक्री करीत असल्याचे समजते. या परिसरापासून तुमसर पोलीस स्टेशन केवळ १०० ते १५० मीटर अंतरावर आहे. पोलीस विभागात गोपनीय खाते आहे. हा गोपनिय विभाग काय करतो हा मुख्य प्रश्न आहे. तलाव परिसराजवळच शाळा आहेत. त्यामुळे अंमली पदार्थाची विक्री नेमकी कुणाला केली जाते हा संशोधनाचा विषय आहे. अंमलीपदार्थाच्या विळख्यात येथील युवक तर गेले नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे. गांजा विक्री करणारी टोळी धोकादायक असल्याने त्याबाबत कुणीच बोलायला पुढे येत नाही. ही शोकांतिका असून पोलिसांनी येथे सक्रीय राहुन कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)