जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार : कोका अभयारण्यातील पर्यटनाला चालना युवराज गोमासे करडी (पालोरा) सन २०१३ मध्ये निर्मित कोका वन्यजीव अभयारण्यातील पर्यटनाला चालना मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत जिल्हानिधीतून ५६ लाखांचा निधी दिला. १०० वर्ष जुन्या विश्राम गृहाचा प्रादेशिक वनविभागाच्या देखरेखित कायापालट झाला. या निधीतून विश्रामगृहाचे नुतनीकरण, फर्निचर, किचनशेड, इलेक्ट्रिक फिटींग, पोर्चचे व बगीच्याचे सौंदर्यीकरण, सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम आदींचा समावेश आहे. पर्यटन वाढीची अपेक्षा व्यक्त होत आहे.कोका येथील वनविभागाच्या अधिकारातील वन विश्रामगृहाचे बांधकाम इंग्रजांच्या काळात सन १९१२ मध्ये करण्यात आले होते. चुना, विट, सागवन लाकुड, बेल व दगडी फर्ची आदी साहित्याच्या माध्यमातून बांधकाम पुर्ण करण्यात आले. सन २०१२ मध्ये या विश्रामगृहाला १०० वर्ष पूर्ण झाले. पंरतू बांधकामाला तडा गेल्या नव्हत्या किंवा ईमारतीचे नुकसान झाले नव्हते. मात्र लाकडी साहित्य वाळवीने फस्त केले होते. ईमारतीचा प्लास्टर उखडला होता. सन २०१५ मध्ये विद्यमान जिल्हाधिकारी धिरजकुमार शासकिय दौऱ्यानिमित्त कोका येथे आले असता त्यांनी नागरिकांच्या समस्या याच ठिकाणी बसून एैकल्या. त्यावेळी नागरिकांनी वनविश्राम गृहाच्या दुरावस्थेची समस्या मांडीत निधी देण्याची मागणी केली होती. जिल्हाधिकारी महोदयांनी नव्यानेच अस्तित्वात आलेल्या कोका अभयारण्यातील पर्यटनाला चालना मिळण्यासाठी आवश्यक बाब असल्याचे लक्षात घेत वेळीच लक्ष देण्याचे आश्वासन त्यावेळी दिले होते.जिल्हाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना, पर्यटन प्रेमिना दिलेलाशब्द पाळला, अल्पावधीत कोका येथील प्रादेशिक वन विभागाच्या अधिकारातील विश्राम गृहाच्या जिर्णोध्दारासाठी जिल्हा निधीतून ५६ लाखांचा निधी विविध विकास कामे व नुतनीकरणाच्या कामांसाठी दिला. सदर कामाचे कंत्राट राज कंस्ट्रक्शन कंपनी लाखनी तसेच मॅथ्युजॉन कंस्ट्रक्सन कपंनी भंडारा यांना मिळाले असून कामे पुर्णत्वाच्या मार्गात आहेत. या निधीतून विश्रामगृहाचे नुतनीकरण, सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम, किचन शेड, विद्युत साहित्य, पोर्चचे व बगीच्याचे सौदंर्यीकरण, शौचालय व बाथरुममध्ये आधुनिक साहित्यांचा वापर आदी व अन्य कामांचा समावेश आहे. यातील बरेचशे काम अंतिम टप्यात असून बगीच्याचे काम जूनपर्यंत पूर्ण होण्याचा मानस आहे. विश्रामगृहाचे बुकिंग वन विभाग भंडारा कार्यालयातून होणार असून बगीच्याचे काम जूनपर्यंत होण्याचा मानस आहे. विश्रामगृहाचे बुकिंग वनविभाग भंडारा कार्यालयातून होणार असून मे अखेर उद्घाटन होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. प्रादेशिक वनविभाग भंडारा व कोका वनविभागाचे वनक्षेत्र सहायक डब्ल्यू. आर. खान यांच्याकडे सदर कामांचे नियंत्रण व देखरेखीची जबाबदारी सोपविण्यात आली असून वनरक्षक विपीन डोंगरे, वनमजूर मारोती आगासे, केवळराम वलके, शंकर तिजारे यांचे सहकार्य लाभत आहे.कोका अभयारण्यातील पर्यटनाला चालना मिळावाी, आकर्षण वाढवे, पर्यटकांना थांबण्यासाठी दर्जेदार व सर्व सोयीसुविधानी परिपर्णु विश्रामगृह मिळावे, पर्यटनातून नागरिकांना रोजगार संधी मिळाव्या, पर्यावरणा विषयी आपुलकी निर्माण व्हावी, या उद्देशाने जिल्हाधिकारी यांनी जिल्हा निधीतून निधी दिला. त्यातून निश्चितच सर्वांना लाभ होणार आहे. चांगल्या सुविधा पर्यटकांना देण्याकडे वन विभागाचे लक्ष राहिल.- डब्ल्यू. आर. खानवनक्षेत्र सहायक कोका.
जिल्हानिधीतून झाला विश्रामगृहाचा कायापालट
By admin | Updated: May 17, 2016 00:22 IST