शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
4
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
5
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
6
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
7
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
8
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
9
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
10
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
11
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
12
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
13
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
14
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
15
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
16
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
17
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
18
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
19
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
20
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!

शिक्षकाची बदली करा नाहीतर आम्ही मुलांचे नाव काढू?

By admin | Updated: January 6, 2017 00:52 IST

शहरात ज्याप्रमाणे शिक्षणाला महत्व आहे त्याप्रमाणे ग्रामीण भागातील गावागावात शिक्षण पोहचले आहे.

प्रकरण कमकाझरीचे : शिक्षकाच्या गैरहजेरीत पोषण आहार शिजविणारी बाई घेते प्रार्थना विशाल रणदिवे   अड्याळ शहरात ज्याप्रमाणे शिक्षणाला महत्व आहे त्याप्रमाणे ग्रामीण भागातील गावागावात शिक्षण पोहचले आहे. अड्याळवरुन ८ किमी अंतरावर डोंगर पायथ्याशी कमकाझरी हे गाव आहे. शासनाच्या धोरणानुसार गाव तिथे शाळा शासन तर आल्या पंरतु कमकाझरी खेडेगावातील या शाळेतील पटसंख्या टिकुन राहावी यासाठी ग्रामस्थांनी आपल्या नातेवाईकांची मुले तर काहीनी कान्व्हेंटमधुन मुलांची नावे काढून या शाळेत दाखल केले. महत्वाचे म्हणजे मागील काळात प्रगत शैक्षणिक धोरणांतर्गत ही शाळा पवनी तालुक्यात गुणांकणात दुसऱ्या क्रमांकावर होती. गावची लोकसंख्या २१० च्या आसपास, शाळेची पटसंख्या २० वर्ग १ ते ४ पर्यंत आहे. मे २०१६ पर्यंत शाळा व्यवस्थीत सुरु होती. मुलांचा अभ्यास, शिक्षण सर्व काही सुरळीत परंतु जेव्हापासून भंडारा तालुक्यातून शिक्षक आले तेव्हापासून या शाळेचे शिक्षण मागे पडले आहे. त्यासोबतच मुलांचे शैक्षणिक, सांस्कृतिक, बौध्दीक व शारीरिक विकास खुंटल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या शाळेची व्यवस्थापन समिती आक्रमक झाली आहे. या शाळेचे गेट कधीच वेळेवर उघडत नाही. शिक्षक वेळेवर येत नाही. आले तरी येथील विद्यार्थ्यांना पोषण आहार शिजवून खाऊ घालणारी बाई या विद्यार्थ्यांची प्रार्थना घेते. कमी मानधनावर काम करणारी महिला जर ही कामे करत असेल तर मग हजारो रूपयांचे वेतन घेणाऱ्या शिक्षकांचा उपयोग कोणता, असा प्रश्न ग्रामस्थांनी केला आहे. लक्ष्मण ईश्वरकर हे आधीपासुन आहेत यांच्या सोबतीला रोटके होते. रोटके यांच्या जागी भंडारा तालुक्यातून शिक्षक आले. ते शाळेत कमी आणि बाहेर जास्त राहत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यामुळे त्या शिक्षकाऐवजी दुसरा शिक्षक द्यावा, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे सभापती, शिक्षण अधिकारी, खंडविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी पवनी यांच्याकडे केली आहे. या मागणीवर कारवाई न झाल्यास शाळेतील २० ही विद्यार्थ्यांची टीसी काढण्याचा ईशारा कमकाझरी येथील पालकांनी दिला आहे.