शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस अधीक्षकांचे स्थानांतरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 21:29 IST

न्याय मागण्यासाठी आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. हा आंदोलनकर्त्यांवर अन्याय आहे. अन्याय करणाऱ्या पोलीस अधीक्षकांचे स्थानांतरण करण्यात यावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा जिल्ह्यातील विविध संघटनांसह राजेगाव ग्रामस्थांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : प्रकरण अशोक लेलँड कारखाण्यासमोरील आंदोलनाचे

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : न्याय मागण्यासाठी आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. हा आंदोलनकर्त्यांवर अन्याय आहे. अन्याय करणाऱ्या पोलीस अधीक्षकांचे स्थानांतरण करण्यात यावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा जिल्ह्यातील विविध संघटनांसह राजेगाव ग्रामस्थांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.निवेदनानुसार, राजेगाव एमआयडीसी अंतर्गत येत असलेल्या रिठी गाव येथील जमिनीवर १९८२-८३ मध्ये अशोक लेलँड कंपनीने अतिक्रमण केले आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने त्या मोबदल्यात बेरोजगारांना रोजगार देण्यात यावे, या मागण्यासाठी अनेकदा अधिकारी व कारखाना व्यवस्थापनाशी चर्चा केली. मात्र प्रत्येक वेळी चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे कारखान्यासमोर उपोषण करण्यात आले. त्यानंतर २६ जानेवारीला ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनस्थळी दोन तहसीलदार, दोन उपविभागीय पोलीस अधिकारी आणि ६ ठाणेदारांसह ग्रामस्थ उपस्थित होते.जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी उपोषण मागे घेतले. मात्र आश्वासनाची पुर्तता न करता कारखाना व्यवस्थापनाकडून आजही उडवाउडवीचे उत्तरे दिले आहे. अधिकाºयांनी आंदोलनकर्त्यांना समजावून शांततेने आंदोलनाची सांगता करण्यात आली असली तरी पोलीस प्रशासनाने मात्र आंदोलन कर्त्यांवर गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामुळे न्याय मागणीसाठी लढा उभारणार नाही काय? रस्त्यावर उतरले नसते तर कारखाना प्रशासन व जिल्हा प्रशासनाने दखल घेतली असती काय? असा सवाल निवेदनातून केला आहे. कंपनीने २६ एकर जमिनीवर अतिक्रमण केल्यानंतरही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही.निवेदनावर रिपब्लिकन सेनेचे अचल मेश्राम, शशिकांत भोयर, राजेगावच्या सरपंचा अनिता कुंजण शेंडे, सामाजिक न्याय संघटनेचे दिनेश वासनिक, भानुदास सार्वे, शालिक गंथाडे आदींच्या स्वाक्षºया आहेत.