शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

सानगडीत २०७ वर्षांपासून रथयात्रेची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 00:29 IST

ऐतिहासिक आणि पौराणिकदृष्ट्या प्रसिद्ध असलेली सानगडी गाव येथे वैकुंठ चतुर्दशीला श्रीपरम भगवान विठ्ठलाची रथयात्रा काढण्यात आली. या रथयात्रात हजारो भावी भक्तांनी हजेरी लावली. २१ नोव्हेंबरला रात्री ८.३० वाजता विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाबरोबर शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले.

ठळक मुद्देऐतिहासिक व पौराणिक महत्त्व : जिल्ह्यासह परजिल्ह्यातील भाविकांची हजेरी

लोकमत न्यूज नेटवर्कसानगडी : ऐतिहासिक आणि पौराणिकदृष्ट्या प्रसिद्ध असलेली सानगडी गाव येथे वैकुंठ चतुर्दशीला श्रीपरम भगवान विठ्ठलाची रथयात्रा काढण्यात आली. या रथयात्रात हजारो भावी भक्तांनी हजेरी लावली.२१ नोव्हेंबरला रात्री ८.३० वाजता विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाबरोबर शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. सानगडी येथील रथयात्रेला विशेष महत्व असून २०७ वर्षापासूनची ही अखंड परंपरा आताही सुरू आहे. दूरवरून ही रथयात्रा बघायला लोक या ठिकाणी आले.श्री विठ्ठल रखुमाई देवस्थान सानगडीच्या वतीने निघालेल्या रथयात्रा महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. २१ नोव्हेंबरला सकाळी ८ वाजता परम भगवान विठ्ठलाची महापूजा पुरोहित दत्तात्रय गाडे यांच्या हस्ते करण्यात आली. पहाटे ५ वाजता ध्यान काकड आरती, सायंकाळी ५ वाजता सामुदायीक प्रार्थना, ६ वाजता हरिपाठ २० नोव्हेंबरला ३ वाजता हंडीफोड व म्युजीक बॉल, चमचा गोळी, मेनबत्ती स्पर्धा, लंगडी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले.२१ नोव्हेंबरला सकाळी ९ वाजता रथ सजावट, सायंकाळी ६ वाजता तुळशी विवाह व रात्री ८.२० वाजता रथपूजा व रथयात्रेत प्रारंभ करण्यात आले.या यात्रेत भंडारा जिल्हा परिषद सदस्या रेखाताई वासनिक, पंचायत समिती सभापती धनपाल उंदिरवाडे, नवनिर्वाचित सरपंच उषा करपते, सरपंच रेखाताई वंजारी उपस्थित होते. २२ नोव्हेंबरला दुपारी २ वाजता काल्याचे कीर्तन गणेश नानेलवार यांचे हस्ते पार पडले.यावर्षी रथमहोत्सवामध्ये आकर्षक म्हणून शारीरिक कवायतीचे कार्यक्रम उस्ताद धनराज साखरे, जासवंत डुंडे, समोरा खाँ पठान यांच्या उपस्थितीत पार पडले. धार्मिकत बरोबरच सामाजिक जनजागृतीचा मंगळातर्फे महत्व देण्यात येत असून उपरोक्त आधुनिक युगातही ही रथयात्रा आजही आपले वर्चस्व टिकवून आहे.विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी जिल्ह्यातील हजारो भाविकांनी आपली उपस्थिती दर्शविली. प्रत्येकाच्या तोंडी एकच वचन दिसून येत होता तो म्हणजे जाऊ देवाचिमे गावा देव देईल विसावा. देवस्थान कमेटीच्या वतीने गिरीधर नेवारे, राजेश पेशेकर, शिवताप वाघाडे, हरिचंद्र राऊत, हिरामन कोहळे, तसेच भाविक सानगडीवासी यांनी अथक प्रयत्न केले.