शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

धान खरेदी केंद्रांवर व्यापाऱ्यांचा ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 05:00 IST

खरेदी केंद्रावरच विकत असल्याचे दिसत आहे. शेकडो शेतकऱ्याचा धान विक्रीच्या प्रतीक्षेत असताना व्यापारी मात्र हितसंबंधातून धानाची विक्री करीत असल्याचे जिल्ह्यातील बहुतांश खरेदी केंद्रावर चित्र आहे. यामुळे जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्याना दरवाढीचा फायदा होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देदरवाढीचा परिणाम : जिल्ह्यातील ७४ खरेदी केंद्र हाऊसफुल्ल, बारदाणाअभावी खरेदी झाली ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांकडून कमी किंमतीत विकत घेतलेला धान आता दरवाढीनंतर व्यापारी आधारभूत खरेदी केंद्रावरच विकत असल्याचे दिसत आहे. शेकडो शेतकऱ्याचा धान विक्रीच्या प्रतीक्षेत असताना व्यापारी मात्र हितसंबंधातून धानाची विक्री करीत असल्याचे जिल्ह्यातील बहुतांश खरेदी केंद्रावर चित्र आहे. यामुळे जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्याना दरवाढीचा फायदा होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.सर्वसाधारण धानाला १८१५ आणि उच्चप्रतीच्या धानाला १८३५ रूपये दर होता. गेल्या कित्येक वर्षापासून बोनसची आणि दरवाढीची मागणी होती. महाविकास आघाडी सरकारने धानाला ५०० रूपयाचा बोनस जाहीर केला. त्यापाठोपाठ नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात धानाला आणखी २०० रूपयाची दरवाढ देण्यात आली. त्यामुळे धानाचे भाव २५०० रूपयाच्या घरात पोहचली आहे. याचा धान उत्पादक शेतकºयांना फायदा व्हावा, अशी अपेक्षा आहे. परंतु अडचणीत असलेल्या शेतकºयांनी सर्वसाधारण धान १६०० तर उच्च प्रतीचा धान २१०० रूपये प्रती क्विंटलने व्यापाºयांना विकला. सुरूवातीला चुकारे मिळण्यास विलंब झाल्याने शेतकरी व्यापाऱ्यांना धान विकत होते. आता बहुतांश शेतकऱ्यांनी धान व्यापाऱ्यांना विकल्यानंतर दरवाढ झाली आहे. याचा फायदा आता शेतकऱ्यांना होण्याची सूतराम शक्यता नाही. दरवाढीने व्यापारी आता आपला माल शासनाच्या आधारभूत केंद्रावर आणून विकत आहे. बहुतांश व्यापारी हा धान शेतकºयांच्याच नावावर विकण्याच्या तयारीत आहे. अनेक व्यापारी शेतकऱ्यांना सातबारा मागताना दिसत असून काही व्यापारी कोऱ्या विड्रालवर शेतकऱ्यांची सही घेत असल्याचे चित्र आहे. या सर्व प्रकाराची चौकशी होण्याची गरज आहे. परंतु तक्रार करण्यासाठी कुणीही पुढे येत नसल्याचे दिसत आहे.आठ दिवसांपुर्वी आधारभूत केंद्रावरील गर्दी ओसरली होती. परंतू शासनाने २५०० रूपये धानाला दर देताच पुन्हा गर्दी वाढली आहे. शेतकऱ्यांपेक्षा व्यापारीच मोठ्या प्रमाणात खरेदी केंद्रावर धान आणत असल्याचे दिसत आहे. धान खरेदी केंद्रावर व्यापारी हितसंबंधातून आपला धान विकत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे एकदा ऑनलाईन नोंदणी झाल्यानंतर दुसरीकडे धान विकता येत नाही. या सर्वाचा फायदा जिल्ह्यातील धान व्यापारी घेत आहे. लाखो रूपयांची कमाई या काळात धान व्यापारी करीत असल्याचे शेतकरी सांगतात. सर्वप्रकार माहित असला तरी आर्थिक अडचणीमुळे आणि धान खरेदी केंद्रावरील होणाºया प्रचंड विलंबाने शेतकऱ्यांना आपला धान व्यापाºयांना विकल्याशिवाय पर्याय नसतो.

अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षानेकेंद्रावर धान अडलेलाखांदूर : तालुक्यात सहा हजार ८५७ शेतकºयांनी दोन लाख २२ हजार ८० किलो धानाची विक्री केली आहे. मात्र गोदामातील धानाची उचल होत नसल्याने धान केंद्रावरच अडकून पडले आहे. दोन महिन्यांपासून धान खरेदी केंद्रावरील धानाची उचल झाली नाही. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

पवनी येथे गोदामाचा अभावपवनी : तालुक्यातील पवनी, आसगाव चौ. अड्याळ, कोंढा, खातखेडा येथे धान खरेदी सुरु आहे. आतापर्यंत ४५ हजार ९३६ क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. पवनी कृषी उत्पन्न बाजार समिती आणि खातखेडा येथे गोदाम उपलब्ध नाही. त्यामुळे दोन्ही केंद्रावरील खरेदी बंद करण्यात आली आहे. शेतकऱ्याचे धान गोदामाबाहेर ठेवण्यात आले आहे. विविध कार्यकारी सोसायटीचे गोदाम प्रत्येक गावात उपलब्ध आहेत. त्या गोदामात व्यवस्था करण्याची गरज आहे.जिल्ह्यात सात लाख क्विंटल धान खरेदीजिल्ह्यात धान खरेदीची ७४ केंद्र सुरू आहेत. १ नोव्हेंबरपासून आतापर्यंत सात लाख एक हजार ५८० क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. १४ डिसेंबरपर्यंत विकलेल्या धानाचे ९० कोटी ३७ लाख रूपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. १५ हजार ९०५ शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली आहे.जिल्हा पणन कार्यालयाचा भोंगळ कारभारलाखांदूर : जिल्ह्यातील बहुतांश खरेदी केंद्र हाऊसफुल्ल झाल्याने शेतकऱ्यांचा धान घरीच पडून आहे. केंद्रावरील धानाची उचल होत नाही. विशेष म्हणजे धान उचलण्यासाठी संबंधीत विभागाच्या प्रधान सचिव व सहसचिवांनी मिलर्सच्या नियुक्त्या करण्याची सूचना जिल्हा पणन अधिकारी प्रादेशिक व्यवस्थापकांना दिल्या होत्या. मात्र अद्यापही मिलर्सच्या नियुक्त्या झाल्या नाही. त्यामुळे गोदाम तुडूंब भरले असून खरेदी ठप्प झाली आहे. यामुळे शेतकऱ्यात संताप व्यक्त होत आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी ८ नोव्हेंबर रोजी मिलर्सच्या नियुक्तीबाबत आदेश दिले होते. परंतु या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचे जिल्ह्यात दिसत आहे.गोदाम झाले हाऊसफुल्लच्मोहाडी : पेंच व बावनथडी प्रकल्पाच्या पाण्यामुळे गतवर्षीपेक्षा यावर्षी धानाचे उत्पन्न अधिक झाले. त्यामुळे मोहाडी तालुक्यातील आधारभूत धान खरेदी केंद्र हाऊसफुल्ल झाले आहे. मोहाडी, मोहगावदेवी, ताडगाव, कांद्री डोंगरगाव, उसर्रा, काटेबाम्हणी, पारडी, पालोरा या गावी धानाची खरेदी सुरू आहे. गोदाम पूर्ण भरल्याने शेतकऱ्याचा धान उघड्यावर ठेवलेला आहे. पावसाची शक्यता लक्षात घेता धानावर प्लॉस्टिकचे आच्छादन करण्यात आले आहे.

कांद्री केंद्रावर गौडबंगालच्मोहाडी तालुक्यातील कांद्री धान खरेदी केंद्राला २५ ते ३० गावे जोडण्यात आली आहे. येथे मोठ्या प्रमाणात शेतकरी धान घेवून आले आहे. परंतु टोकन मिळत नसल्याने शेतकºयांचा वाद केंद्रावरील कर्मचाऱ्यांसोबत होत आहे. अनेक शेतकऱ्यांचे धान उघड्यावर असल्याचे येथे दिसत आहे. विशेष म्हणजे या धान खरेदी केंद्रावर एका व्यापाऱ्यांने दाबा मिळविल्याचे दिसत आहे.

आठवडाभरात केंद्र बंद होण्याची भीतीच्साकोली : तालुक्यात ११ केंद्रावर धान खरेदी केली जात आहे. सर्व केंद्र हाऊसफुल्ल झाले आहे. शासनाने धानाला बोनस धरून २५०० रूपये भाव जाहीर केल्याने आता ठोकळ धानासोबत बारीक धानही केंद्रावर विक्रीसाठी येत आहे. यामुळे सर्व खरेदी केंद्र हाऊसफुल्ल झाली आहे. शासनाने या धानाची उचल एक दोन दिवसात केली नाही तर गोदामाअभावी आठवडाभरात धान खरेदी केंद्र बंद होण्याची भीती आहे.

अनेक केंद्रावरील बारदाणा संपलाच्तुमसर : धानाचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाºया तुमसर तालुक्यातील अनेक केंद्रावरील बारदाणा संपल्याचे चित्र आहे. त्याचा परिणाम धान खरेदीवर होत आहे. तालुक्यात १६ केंद्रावर धानाची खरेदी सुरू आहे. उघड्यावर असलेला धान ढगाळ वातावरणाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालत आहे. अवकाळी पाऊस आला तर धान भिजण्याची मोठी भीती शेतकºयांना आहे. त्यासाठी खरेदी वेगाने होण्याची गरज असून बारदाणा पुरवठा करण्याची मागणी तुमसर तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

अवकाळी पावसाची टांगती तलवारच्पालांदूर : शासकीय धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची तोबा गर्दी झाली आहे. तर दुसरीकडे अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ झाली आहे. दुसरीकडे बारदाना टंचाई आणि गोदाम हाऊसफुल्ल होत असल्याचे चित्र आहे. पालांदूर परिसरात कवलेवाडा, जेवनाळा, देवरी, मऱ्हेगाव येथे धान खरेदी सुरू असून बारदान्याअभावी तीन दिवसानंतर एक दिवस खरेदी बंद करावी लागत आहे.

टॅग्स :agricultureशेती