शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

विषमुक्त शेती-जहरमुक्त अन्नासाठी गोपालन गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 22:24 IST

गोहत्या करणारा व ते मांस सेवन करणारा हा मुस्लीम धर्मात चुकीचे काम करतो. आमच्या धर्मात या प्रकाराला कोणतेही स्थान नाही. आज गोहत्या आणि एक महिन्याच्या गाईच्या वासराच्या कातड्याचे पर्स बनविण्यापासून तर कितीतरी उद्योग मोठ्या समुदायात सुरू आहेत. गो हत्याच्या नावावर हिंदू आणि मुस्लीम वाद करून देशामध्ये द्वेष आणि धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम सुरू आहे.

ठळक मुद्देमोहम्मद फैज खान : लेह येथून जून २०१७ ला सुरू झाली पदयात्रा, १२ राज्यातून भंडाऱ्यात आगमन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गोहत्या करणारा व ते मांस सेवन करणारा हा मुस्लीम धर्मात चुकीचे काम करतो. आमच्या धर्मात या प्रकाराला कोणतेही स्थान नाही. आज गोहत्या आणि एक महिन्याच्या गाईच्या वासराच्या कातड्याचे पर्स बनविण्यापासून तर कितीतरी उद्योग मोठ्या समुदायात सुरू आहेत. गो हत्याच्या नावावर हिंदू आणि मुस्लीम वाद करून देशामध्ये द्वेष आणि धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम सुरू आहे. परंतु उच्चस्तरावर मोठ्या प्रमाणात गोहत्या होत आहे. या कंपण्यांच्या मालकांना आपला उद्योग निश्चिंतपणे करता यावा यासाठी देशात हिंदू व मुस्लीम समाजात तेढ निर्माण करून आपला उद्देश साध्य करीत असल्याचा घणाघाती आरोप गोसेवा सद्भावना पदयात्रेसाठी निघालेले मोहम्मद फैज खान यांनी केला आहे.गोसेवा सद्भावना पदयात्रेसाठी फैज खान यांनी २४ जून २०१७ पासून लेह (लद्दाख) येथून पदयात्रेला सुरूवात केली आहे. ही पदयात्रा १२ हजार किमीची आहे.यावेळी ते म्हणाले, देशातील जमीन सुपीक करायची असेल तर देशी गोवंश आणि तिचे शेण व गोमुत्राशिवाय पर्याय नाही. नाहीतर युरीया व रासायनिक खताने धरतीमाता मृत पावेल. विषारी अन्न आपल्या पोटात जात आहे. यामुळे आजाराला आमंत्रण मिळत आहे. कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाबाने लोकांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे गोपालन करणार नाही आणि गोहत्या करणार तर विषारी अन्न मुस्लीम, बौध्द, हिंदु, पंजाबी, सर्व धर्मीय लोक खातील व आजारी पडतील. परिणामी देशाचे नुकसान होईल. त्यामुळे देशी गौवंश पाळणे हाच त्यावर एकमेव पर्याय राहणार आहे.मोहम्मद फैज खान हे लेह येथून २४ जून २०१७ ला निघाले आहेत. आतापर्यंत १२ राज्यातून प्रवास करीत ते रविवारला लाखनीमार्गे भंडाºयात आले. त्यांचे त्रिमूर्ती चौकात नगराध्यक्ष सुनिल मेंढे, प्रगतशील शेतकरी संजय एकापुरे, उद्योजक मयुर बिसेन, शैलेंद्र निकासक, नगरसेवक मंगेश वंजारी, युनिटी फॉर आॅलचे संयोजक सरफराज खान यांनी त्यांचे स्वागत केले.त्यानंतर त्यांच्या प्रबोधन कार्यक्रमाला शहरातील हिंदू मुस्लीम बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. प्रास्ताविकात डॉ.संजय एकापुरे यांनी विषमुक्त शेती करण्यासाठी देशी गौवंश पाळण्याशिवाय पर्याय नाही. विषमुक्त शेती जहरमुक्त अन्न तयार करण्यासाठी देशी गोवंश पाळणे आवश्यक असल्याचे सांगितले.सद्भावना पदयात्रेचा उद्देशदेशी गोवंशाची सेवा, संरक्षण व संवर्धनासाठी जनजागृती करणे, देशी गोवंशावर आधारित शेतीला प्रोत्साहित करणे, देशी गोवंशाचे पर्यावरण, समाज, आरोग्य व प्रकृतीमध्ये असलेले महत्त्व जनसामान्यापर्यंत पोहचविणे, गोहत्यावर पूर्ण प्रतिबंध लावण्यावर कायदा करण्यासाठी लोकप्रतिनिधींना जागृत करणे, नदींचे संरक्षण, वृक्षारोपण, स्वच्छता व स्त्री भ्रुणहत्या याबाबत जनजागृती करणे, अखंड भारत निर्माण करणे आणि पुन्हा भारताचे प्राचीन वैभव स्थापित करुन भारताला विश्वगुरुचा दर्जा मिळवून देण्यासाठी आपली ही पदयात्रा असल्याचे मोहम्मद फैज खान यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.