शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
2
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
3
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
4
अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?
5
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
6
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
7
आम्ही ४ वर्षांपासून बोलत नव्हतो! संजय कपूर यांच्या निधनानंतर बहिणीची पोस्ट, म्हणाली- "जे काही घडलं ते भयानक..."
8
काळ आला होता पण..; घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट, पाहा अंगावर काटा आणणारा Video
9
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
10
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?
11
"तुम्ही विमान उडवण्याच्या लायक नाही, जा बूट...", इंडिगोच्या प्रशिक्षणार्थी पायलटचा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जातीभेदाचा आरोप; एफआयआर दाखल
12
Cluster Bomb: क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय, १२३ देशांमध्ये त्यावर बंदी का?
13
गुजरातमध्ये 'आप'कडून मोदी आणि भाजपाला जबर धक्का, पोटनिवडणुकीत मिळवला दणदणीत विजय
14
ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस आली अंगलट; पाकिस्तानी नेत्यांची पुन्हा फजिती
15
तुमचेही पैसे रिअल इस्टेटमध्ये अडकलेत का? फक्त १% लोकच कमवतायत नफा! तुम्ही 'या' चुका तर करत नाहीये ना?
16
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
17
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
18
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
19
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
20
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!

बोचऱ्या थंडीत पर्यटकांची पावले 'गोसेखुर्द'कडे

By admin | Updated: December 13, 2015 00:30 IST

ऐतिहासिक पवनी शहरातील व तालुक्यातील ऐतिहासिक, निसर्गरम्य, मनमोहक पर्यटन स्थळाला दररोज मोठ्या संख्येने पर्यटक भेटी देत आहेत.

पवनी विदर्भाची काशी : महासमाधीभूमी महास्तूप, पंचमुखी गणेश मंदिर, वन्यजीव अभयारण्य आकर्षणाचे स्थळलक्ष्मीकांत तागडे पवनीऐतिहासिक पवनी शहरातील व तालुक्यातील ऐतिहासिक, निसर्गरम्य, मनमोहक पर्यटन स्थळाला दररोज मोठ्या संख्येने पर्यटक भेटी देत आहेत. हिवाळा सुरु झाल्यामुळे थंडीच्या दिवसात येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. भेट देत असलेल्या पर्यटन स्थळात विदर्भातील सर्वात मोठे इंदिरासागर गोसेखुर्द धरण, रुयाड सिंदपूरी येथील पत्र्त्रा मेत्ता संघाच्या आंतरराष्ट्रीयस्तराची महासमाधीभूमी महास्तूप, पवनीतील ऐतिहासिक किंवा विदर्भातील अष्टविनायकापैकी एक पंचमुखी गणेश मंदिर, उमरेड-कऱ्हांडलाचे पवनी वन्यजीव अभयारण्य आदी पर्यटन स्थळाचा समावेश आहे.पवनीपासून १२ किलोमीटर अंतरावर महत्वाकांक्षी गोसीखुर्द धरण आहे. या धरणात पाण्याची साठवणूक केल्यामुळे धरणाचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. धरणाच्या घाटउमरीच्या बाजूने असलेले हिरव्या वनराईने नटलेले डोंगर धरणाचे निळेशार पाणी पाहूनच पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फेडले जातात. धरणाच्या ३३ वक्रदारांनी धरणाला भव्य बनवले आहे हे धरण नेहमी चर्चेत राहत असल्यामुळे रोजच पर्यटकांची येथे गर्दी होत आहे पवनीनजिक रुयाड सिंदपूरी येथील पत्र्त्रा मेत्ता संघद्वारा निर्मित महासमाधीभूमी महास्तूप भारताच्या स्थापत्त्य क्षेत्रात नावीन्यपूर्ण ठरला आहे. या आंतरराष्ट्रीय स्तराच्या महास्तुपाच्या निर्मितीमुळे देश विदेशामध्ये भंडारा जिल्हा जगाच्या नकाशावर आला आहे. शांतीचा संदेश देणारा हा महास्तूप भारत जपानच्या मैत्रीचा प्रतीक ठरला आहे. या महास्तुपमधील सम्यक सम्बुध्दाची ४० फुट उंच मुर्ती शांत सभागृहात मनाला शांती देते. पवनी हे ऐतिहासिक व प्राचीन शहर आहे. पवन राजाने या शहराला वसविले. ही त्याची राजधानी होती. प्राचीन काळात पवनी वैभवशाली शहर म्हणून प्रसिध्द होते. मौर्य, वाकाटक, शृंग, सातवाहन, यादव काळात हे शहर प्रगत होते. या शहरावर यादव, गोंड, भोसले राजांनी राज्य केले. यादवानंतर चंद्रपुरच्या गोंड राजाने पवनी येथील डोंगरावर १५ व्या शतकात किल्ला बांधला. शहराच्या तीन बाजुला टेकड्यावर तीन मैल किल्ला बांधला. नंतर १७० व्या शतकात भोसल्यांचे राज्य आले. परकोटसदृश किल्ल्यामधून बंदुका, तोफामधून गोळ्या मारण्याचे छिद्रे आहेत. हा किल्ला आपली ऐतिहासीकतेची साक्ष देत आजही उभा आहे. शहरात अष्टविनायकापैकी एक पंचमुखी गणेश मंदिर हे जागृत देवस्थान आहे. या मंदिरातील पंचमुखी गणेशाची मूर्ती ही दहाव्या शतकातील असल्याचे मानले जाते. एका शिळास्तंभावर चारही बाजूने गणेशांच्या मुर्त्या कोरल्या आहेत. पाचवी मुर्ती नैऋत्य दिशेला कोरली आहे. नवनिर्मित उमरेड-करांडला च्या पवनी वन्यजीव अभयारण्यामधील जंगल हे घनदाट, विस्तीर्ण असल्यामुळे येथे अनेक वन्यप्राणी व पक्षी मुक्तपणे फिरत असतात. त्यामुळे अभयारण्यात पर्यटकांची गर्दी होत आहे.